Join us

कोरोना लढ्याला एक वर्ष पूर्ण, १६०० कोटी खर्च; ९.६४ टक्के बाधित, १९१ कोविड योद्धे गमावले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 11:58 PM

गेल्या वर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण मुंबईत झपाट्याने होऊ लागला होता. या काळात मुंबईतील अनेक विभाग कोरोनाच्या जाळ्यात सापडले होते. (CoronaVirus)

मुंबई- मुंबईवर ओढावलेल्या कोरोना संकटाला गुरुवारी एक वर्ष पूर्ण झाले. पहिला रुग्ण ११ मार्च रोजी सापडला होता. आतापर्यंत तीन लाख ३७ हजार मुंबईकर बाधित झाले आहेत. तर ९३ टक्के कोरोनामुक्त झाले. मात्र या संकटाला एक वर्ष पूर्ण होत असताना पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. मुंबईत आतापर्यंत ३५ लाख चाचण्या करण्यात आल्या असून यामध्ये बाधित रुग्णांचे प्रमाण ९.६४ टक्के आहे.  (One year completes to Corona fight , costs Rs 1,600 crore 9.64 per cent infected losing 191 Kovid warriors)

गेल्या वर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण मुंबईत झपाट्याने होऊ लागला होता. या काळात मुंबईतील अनेक विभाग कोरोनाच्या जाळ्यात सापडले होते. बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली होती. त्यामुळे बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने ३६ टक्के मुंबईकरांना होम क्वारंटाइन व्हावे लागले होते. कोरोनाविरुद्ध लढ्यात पालिकेची संपूर्ण यंत्रणा उतरली होती. या काळात चेस द वायरस, डॉक्टर आपल्या दारी, फिव्हर क्लीनिक, माझे कुटुंब माझी जबाबदारी, मोहीम राबवण्यात आली. 

हॉटस्पॉट ठरलेल्या आशिया खंडातील धारावीसारख्या मोठ्या झोपडपट्टीने कोरोना लढ्याचा आदर्श जगासमोर ठेवला. या लढ्यात पालिकेचे १९१ कर्मचारी - अधिकारी, तर बेस्टच्या ६५ कर्मचारी - अधिकाऱ्यांनी आपला जीव गमावला. नोव्हेंबर महिन्यापासून मुंबईतील कोरोनाचा प्रसार नियंत्रणात येऊ लागला. जानेवारी अखेरीपर्यंत रुग्णांची संख्या तीनशेपर्यंत खाली आली होती. परंतु मुंबईतील सर्व व्यवहार पुन्हा एकदा सुरू झाल्यामुळे  फेब्रुवारीपासून रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी मुंबई व महापालिका पुन्हा एकदा सज्ज झाली आहे.

अशी आहे कोरोनाची आकडेवारी -एकूण बाधित रुग्ण - ३३७१२३कोरोनामुक्त - ३१३३४६मृत्यू - ११५११सक्रिय रुग्ण - ११३७९लक्षणे नसलेले - ६८७८लक्षणे  असलेले - ४१२८अत्यवस्थ - ३७३ 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई