अर्भकाला पळविल्याप्रकरणी महिलेला एक वर्षाचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 05:14 AM2018-01-02T05:14:46+5:302018-01-02T05:15:06+5:30

तब्बल १० वर्षांपूर्वी महापालिकेच्या रुग्णालयातून एका अर्भकाला पळविल्याप्रकरणी अंधेरी दंडाधिका-यांनी एका महिलेला एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली.

 One year imprisonment for woman | अर्भकाला पळविल्याप्रकरणी महिलेला एक वर्षाचा कारावास

अर्भकाला पळविल्याप्रकरणी महिलेला एक वर्षाचा कारावास

Next

मुंबई: तब्बल १० वर्षांपूर्वी महापालिकेच्या रुग्णालयातून एका अर्भकाला पळविल्याप्रकरणी अंधेरी दंडाधिका-यांनी एका महिलेला एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. विवाह होऊन १० वर्षे उलटूनही आरोपीला बाळ होत नव्हते. आरोपीच्या मैत्रिणीने तिला बाळ देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मैत्रिणीने आश्वासन पूर्ण न केल्याने आरोपीचे गरोदरपणाचे नाटक उघडे पडले. त्यामुळे आरोपीने बाळ चोरण्याचा मार्ग निवडला.
या केसची सत्यता पडताळत, न्यायालयाने आरोपीला दया दाखवत तिला कमी शिक्षा ठोठावली. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, रीटा यादव हिने ५ मे २००७ रोजी जोगेश्वरीच्या पालिका रुग्णालयात मुलाला जन्म दिला. दोन दिवसांनंतर अज्ञात महिलेने नर्स असल्याचे नाटक करत, संबंधित वॉर्डमधील बाळांची तपासणी केली. रिटाच्या बाळाची तब्येत ठीक नसल्याने त्याची तपासणी आवश्यक असल्याचे सांगत, आरोपीने बाळाला ताब्यात घेतले आणि एका तासात परत आणू, असे सांगितले.
अर्ध्या तासानंतर रीटाने तिचा पती संतोष यादव याला बाळाला पाहून यायला सांगितले. त्या वेळी बाळाचे अपहरण झाल्याचे लक्षात आले. चौकशी दरम्यान मेघवाडी पोलिसांना एका महिलेकडे संशयास्पद परिस्थतीत एक बाळ असल्याची टिप मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, तपास करत असताना पोलिसांनी नाझनीन शेख हिच्या ताब्यात एक बाळ असल्याचे समजले. त्यांनी पोलिसांत तक्रार केली.
पोलिसांनी तिला याबाबत उलटसुलट प्रश्न विचारल्यानंतर नाझनीनचे पितळ उघडे पडले. तिच्या ताब्यात असलेले बाळ रीटा यादवचे असल्याचे सिद्ध झाले. या प्रकरणी बाळाची आई व पंच साक्षीदार यांनी न्यायालयात साक्ष दिली आहे.

नाझनीनचे पितळ उघड पडले
खटल्यातील दुसरी महिला आरोपी नफिसाच्या घरातून पोलिसांनी बाळाच्या कपड्यांची बॅग जप्त केली. दंडाधिकाºयांनी नफिसाची सुटका केली. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, नफिसानेच नाझनीनला तिचे बाळ देण्याचे आश्वासन दिले होते. तिच्या आश्वासनामुळे नाझनीनने गरोदर असल्याचे नाटक करून घरच्यांना फसविले. मात्र, प्रसूती झाल्यानंतर नफिसाने नाझनीनला बाळ देण्यास नकार दिला. त्यामुळे नाझनीनचे पितळ उघडे पडले. नफिसाने तिला बाळ न देता, कुणाचे तरी बाळ चोरण्याचा सल्ला दिला. रीटा यादव हिने नाझनीनला न्यायालयात ओळखले. नाझनीन विरुद्ध सबळ पुरावे असल्याने, दंडाधिकाºयांनी तिला एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली.

Web Title:  One year imprisonment for woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.