Join us

ओएनजीसीवर मोर्चा

By admin | Published: June 27, 2014 11:39 PM

प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी शुक्रवारी मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन भवनावरच मोर्चा काढण्यात आला होता.

उरण : उरणच्या ओएनजीसी प्रकल्पातील कंत्रटी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी शुक्रवारी मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन भवनावरच मोर्चा काढण्यात आला होता. मनसेच्या दणक्याने वठणीवर आलेल्या अधिका:यांनी चर्चेनंतर येत्या आठ दिवसात मुंबई येथील मुख्यालयात बैठक बोलावून कंत्रटी कामगारांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन ओएनजीसी अधिका:यांनी दिले आहेत.
उरण येथील ओएनजीसी प्रकल्पात अनेक कामगार कंत्रटी पद्धतीनवर काम करीत आहेत. अनेक वर्षापासून काम करीत असतानाही अशा काम करणा:या कंत्रटी कामगारांना अनेकवेळा आश्वासनानंतरही कायम केले नाही. या कंत्रटी कामगारांसाठी 2क्क्8 पासून वेतनवाढीचा करारही करण्यात आलेला नाही. स्थानिकांना डावलून परप्रांतीय कामगारांची भरती केली जात आहे. येथील सुरक्षा रक्षकांचे मागील सहा महिन्यांपासून वेतन थकीत आहे. याबाबत वारंवार विनंत्या करूनही ओएनजीसी प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्षच केले जात आहे. त्यामुळे कंत्रटी कामगारांच्या न्याय हक्कासाठी रायगड जिल्हा मनसेचे अध्यक्ष अतुल भगत यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी उरणच्या ओएनजीसी प्रकल्पावरच मोर्चा काढला होता. चारफाटा येथून निघालेल्या मोर्चात मनसेचे राज्य कामगार संघटनेचे सचिव सचिन गोळे, जिल्हा सचिव केसरीनाथ पाटील, उपजिल्हाध्यक्ष अतुल चव्हाण, उरण विधानसभा मतदारसंघाचे मनसे अध्यक्ष दीपक कांबळे, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे मनसे अध्यक्ष अविनाश पडवळ, उरण तालुका अध्यक्ष सुनिल भोईर, मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कंत्रटी कामगार या मोर्चात सहभागी झाले होते. ओएनजीसी द्रोणागिरी प्रशासन भवनासमोर ओएनजीसी विरोधात मोर्चेक:यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 
मनसेच्या मोर्चामुळे वठणीवर आलेल्या ओएनजीसी अधिका:यांनी मनसे पदाधिका:यांशी चर्चा केली. यावेळी येत्या आठ दिवसात मुंबई येथील मुख्यालयात बैठक बोलावून कंत्रटी कामगारांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन ओएनजीसी अधिका:यांनी दिले आहेत. मात्र आठ दिवसानंतरही कंत्रटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत दिरंगाई झाल्यास जिल्हा मनसेच्या बळावर यापेक्षाही प्रचंड मोर्चा काढण्याचा इशाराही मनसे पदाधिका:यांनी ओएनजीसी अधिका:यांना दिला. (वार्ताहर)