कांदा ७० ते १०० रूपये किलोच, प्रतीक्षा जानेवारीची
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 03:35 AM2019-12-25T03:35:34+5:302019-12-25T03:38:03+5:30
भाव कमी होण्याची शक्यता नाही : प्रतीक्षा जानेवारीची
एस. के. गुप्ता
नवी दिल्ली : मंड्यांमध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थानचा कांदा कमी प्रमाणात येत असल्यामुळेतो ७० ते १०० रूपये किलो विकला जातो आहे. इजिप्तमधून आयात झालेल्या कांद्यामुळे मंड्यांमध्ये त्याचे भाव ३० ते ४० टक्क्यांनी खाली येतील अशी आशा होती. ती फोल ठरली. आयात कांदा केंद्र राज्य सरकारांना जवळपास ६० रूपये किलो दराने विकत आहे. हा कांदा बाजारात ग्राहकांना ७० रूपये किलोपर्यंत मिळतो आहे.
केंद्रीय ग्राहक मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, देशी कांद्याची आवक जानेवारीच्या सुरवातीला मंड्यांमध्ये सुरू होईल व त्यानंतर त्याचे भाव कमी होण्याची आशा आहे.
खर्च पोहोचला ५८ रूपये किलोवर
आयात कांदा आता देशात बाजारांत दाखल होत आहे ही चांगली बाब आहे. सध्या इजिप्तहून आणलेला कांदादिल्ली आणि आंध्र प्रदेशच्या मंड्यांत पाठवला गेला. कांद्याची खरेदी आणि त्या राज्यांत कांदा बंदरांत पोहोचवण्याचा खर्च ५७ ते ५८ रूपये किलोपर्यंत येत आहे. सध्या इजिप्तहून २९० टन आणि ५०० टन कांदा मुंबईत जवाहरलाल नेहरू बंदरात दाखल झाला आहे. तो राज्य सरकारांना ६० रूपये किलोपर्यंत विकला जात आहे.