Join us

कांदा, शेतकरी प्रश्नी राज्य सरकारला घेरणार, लोकांची फसवणूक सुरू : विरोधकांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 8:15 AM

विराेधकांची मुस्कटदाबी केली जात असून काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाला, जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली जाते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विश्वासघातातून निर्माण झालेल्या सरकारमधील आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात सरकारविरोधात संताप असूनशेतकऱ्यांना सरकारकडून जाहीर केलेली मदत अद्यापही मिळाली नाही. सोलापूरमधील शेतकऱ्याला कांदा विक्री केल्यानंतर अवघ्या दोन रुपयांचा चेक मिळाला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होत आहेत. शेतकरी आत्महत्येत वाढ होत आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात ५२ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या. मात्र तिजोरीचा विचार न करता केवळ मंत्री आणि त्यांच्या आमदारांच्या मतदाररसंघात कोट्यवधींची कामे जाहीर करण्यात आली, मात्र तेवढा निधी सरकारकडे नाही. ही लोकांची फसवणूक आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

विराेधकांची मुस्कटदाबी केली जात असून काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाला, जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली जाते. आदित्य ठाकरे यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर पाळत ठेवली जात आहे, ठाकरे गटाच्या आमदारांवर एसीबीच्या माध्यमातून चौकशी लावली जात आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर छापे मारले जात असल्याकडे पवार यांनी लक्ष वेधले.  

एका आमदाराला मनसे पक्ष देणार का?निवडणूक आयोगाचा निर्णय पक्षपाती असल्याचा आरोप करताना ते म्हणाले, ४० आमदार एका बाजूला असल्याने त्या गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले. उद्या मनसेचा एक आमदार आहे. त्या आमदाराने पक्षावर दावा केल्यास पक्ष त्यांचा होणार का, असा सवाल त्यांनी केला.

करदात्यांच्या पैशांची उधळपट्टीमुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्यावरील चहापानाचे चार महिन्यांचे बिल २ कोटी ३८ लाख रुपये आलेले आहे. चहावर सोन्याचा वर्ख लावून दिला होता का? जाहिरातींवर आतापर्यंत ५० कोटी सरकारने खर्च केले आहेत आणि मुंबई महापालिकेचे १७ कोटी जाहिरातींवर खर्च केले. आपले हसरे चेहरे दाखवण्यासाठी ही उधळपट्टी सुरू असल्याची टीका पवार यांनी केली.

टॅग्स :अजित पवारअर्थसंकल्प 2023