नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला, कांदा व मसाला मार्के ट बुधवारी सुरू झाले असून दिवसभरात तीन हजार टन कृषी मालाची आवक झाली आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यापारी व प्रशासनाची बैठक घेऊन धान्य मार्के ट ही सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. गुरुवारपासून मुंबई व नवी मुंबई मधील धान्य पुरवठा नियमीत सुरू करण्यात येणार आहे.
बुधवारी भाजीपाला मार्के टमध्ये १९३ ट्रक, टेम्पो, कांदा मार्के टमध्ये १५०, फळ मार्के टमध्ये ३ व मसाला मार्के टमध्ये ६७ वाहनांमधून तब्बल तीन हजार टन कृषी मालाची आवक झाली. ३९८ टेम्ंपो भाजीपाला थेट मुंबईत पाठविण्यात आला आहे. एपीएमसीमधील धान्य मार्के ट बुधवारी ही बंद होते. पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी ही धान्य मार्के ट तत्काळ सुरू करण्याच्या सुचना दिल्या होत्या.एपीएमसी वैद्यकीय पथक कार्यरत राहणारबाजार समितीमधील माथाडी कामगार व व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी मार्के टमध्ये वैद्यकीय कक्ष तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. महापालिकेच्या माध्यमातून हा कक्ष सुरू केला जाणार असून बाजार समितीमधील घटकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.