Join us

निर्यातबंदीनंतर मुंबईत कांदा दर घसरले, ग्राहकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 6:00 AM

शासनाने निर्यातबंदी केल्यानंतर मुंबईमध्ये कांदा दर घसरले आहेत. होलसेल मार्केटमध्ये कांदा ३८ ते ४४ रूपये प्रतिकिलोवरून ३२ ते ३६ रूपये झाला आहे.

नवी मुंबई : शासनाने निर्यातबंदी केल्यानंतर मुंबईमध्येकांदा दर घसरले आहेत. होलसेल मार्केटमध्ये कांदा ३८ ते ४४ रूपये प्रतिकिलोवरून ३२ ते ३६ रूपये झाला आहे. किरकोळ मार्केटमध्येही कांदा ७० रूपयांवरून ५० रूपयांवर आला आहे. भाजीपाला मार्केटमध्ये तेजी अद्याप कायम आहे.देशात सर्वत्र कांद्याचे दर वाढू लागले आहेत. मुंबईमध्येही मागणीपेक्षा कमी आवक होत असल्याने दोन महिन्यापासून सातत्याने दर वाढत होते. मुंबई बाजारसमितीमध्ये सोमवारी १०३६ टन कांद्याची आवक झाली. होलसेल मार्केटमध्ये ३२ ते ३६ रूपये प्रतिकिलो दराने कांदा विकला गेला. गत आठवड्यामध्ये हे दर ३८ ते ४४ रूपये किलो पर्यंत गेले होते. किरकोळ मार्केटमध्ये कांदा ७० रूपये किलो दराने विकला जात होता. सोमवारी हे दर ५० रूपयांवर आले आहेत. दर कमी झाल्याने ग्राहकांना अल्पसा दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांनी मात्र निर्यातबंदीविषयी नाराजी व्यक्त केली.दुधी २८ रुपये किलोभाजीपाला मार्केटमध्ये अद्याप तेजी कायम आहे. होलसेल मार्केटमध्ये गत आठवड्यात ३० ते ३५ रूपये किलो दराने विकला जाणारा दुधी ३४ ते ३८ रूपये किलो दराने विकला जात आहे. गाजर २६ ते ३० रूयांवरून ३० ते ३४ रूपये, कोबी १६ ते २० वरून २० ते २४ रूपये, टोमॅटो १० ते २२ वरून २४ ते ३२ रूपये झाला आहे.

टॅग्स :कांदामुंबई