Join us

आवक घसरल्याने कांद्याने घेतली उसळी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 4:46 AM

एपीएमसीमध्ये दर पुन्हा १२० रूपयांवर : १७ बाजारसमित्यांमध्ये दराने ओलांडली शंभरी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमतीमध्ये सोमवारी आवक घसरल्यामुळे कांदा दरामध्ये पुन्हा वाढ झाली आहे. मार्केटमध्ये ८० ते १२० रूपये किलो दराने कांद्याची विक्री झाली आहे. राज्यातील जवळपास १७ बाजारसमित्यांमध्ये दराने पुन्हा शतक ओलांडले असून मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा कमी होत असल्याने पुन्हा दर वाढल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.मुंबई बाजारसमितीमध्ये मागील आठवड्यामध्ये कांद्याचे दर जवळपास ४० टक्के घसरले होते. मार्केटमध्ये नाशिक, पुणे, अहमदनगर, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, तुर्की व ईजीप्तवरून आवक होवू लागल्यामुळे मागणी व पुरवठ्यामधील तफावत काही प्रमाणात दूर करता येत होती. सोमवारी मार्केटमध्ये १ हजार ते १२०० टन आवक होणे अपेक्षीत होते. परंतु प्रत्यक्षात ८१० टनच आवक झाली असून त्यामुळे कांदा दराने पुन्हा उसळी घेतली आहे. ८० ते १२० रूपये किलो दराने कांद्याची विक्री झाली असून किरकोळ मार्केटमध्ये हेच दर १०० ते १४० रूपयांवर गेले आहेत.कोल्हापूरमध्ये ५० ते १४०, सोलापूरमध्ये २ ते १५० रूपये, राहूरी-वांभोरी मध्ये १० ते १२० रूपये, इंदापूरमध्ये ४ ते १४० रूपये प्रतिकिलो दराने कांद्याची विक्री झाली आहे.मुंबईप्रमाणे राज्यातील इतर बाजारसमित्यांमध्येही कांद्याला चांगले दर मिळाले आहेत. कोल्हापूरमध्ये ५० ते १४०, सोलापूरमध्ये २ ते १५० रूपये, राहूरी-वांभोरी मध्ये १० ते १२० रूपये, इंदापूरमध्ये ४ ते १४० रूपये प्रतिकिलो दराने कांद्याची विक्री झाली आहे. आठवड्याची सुरवात शेतकऱ्यांना दिलासा देणारी झाली असून ग्राहकांची चिंता वाढवणारी झाली आहे. आवक कमी असल्यामुळे दर वाढले असून यापुढे किती आवक होणार यावर बाजारभाव अवलंबून असतील अशी माहिती व्यापाºयांनी दिली आहे.

टॅग्स :कांदा