Join us

ऑनलाईन दारू पडली महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अंधेरीतील सीए असलेल्या विवाहितेला ऑनलाईन दारूसाठी १५ हजार मोजावे लागले आहेत. याप्रकरणी अंधेरी पोलीस ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अंधेरीतील सीए असलेल्या विवाहितेला ऑनलाईन दारूसाठी १५ हजार मोजावे लागले आहेत. याप्रकरणी अंधेरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

अंधेरी परिसरात राहणारी ३० वर्षीय विवाहिता जोगेश्वरी परिसरात खासगी कंपीनीत सीए म्हणून कार्यरत आहे. मित्रासाठी ऑनलाईन दारू हवी असल्याने त्यांना गुगलवरून जवळच्या वॉईन शॉपचा क्रमांक मिळवला. अशात संबंधित कॉलधारकाने घरपोच सेवेसाठी क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगितले. क्यूआर कोड स्कॅन करताच त्यांच्या खात्यातून पैसे जाण्यास सुरुवात झाली. मात्र, पैसे आले नसल्याचे सांगून आणखी दोन वेळा क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगून त्यांच्या खात्यातील १५ हजार ६४० रुपयांवर डल्ला मारण्यात आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रविवारी त्यांनी अंधेरी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत.