Join us

आॅनलाइन अर्जाची विद्यार्थ्यांना डोकेदुखी

By admin | Published: July 11, 2015 10:30 PM

शासनाच्या विविध विभागांनी आपले अर्ज आता आॅनलाइन ठेवले आहेत, त्यातच केंद्र सरकारने देखील डिजिटल क्रांतीवर अधिक भर दिला आहे. मात्र शासनाच्या या वेबसाईट

दासगाव : शासनाच्या विविध विभागांनी आपले अर्ज आता आॅनलाइन ठेवले आहेत, त्यातच केंद्र सरकारने देखील डिजिटल क्रांतीवर अधिक भर दिला आहे. मात्र शासनाच्या या वेबसाईट एकतर अद्ययावत नाहीत आणि त्यांचा वेग मंद असल्याने आॅनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना मोठी डोकेदुखी करावी लागत आहे. सायबर कॅफेवर सततच्या फेऱ्यांमुळे वेळ आणि पैसा वाया जात असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी हैराण झाले आहेत.राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता शासनाने विद्यार्थ्यांना तसेच पालकांना शासकीय कार्यालयात सततच्या फेऱ्या बंद व्हाव्यात याकरिता वेबसाईटवरच ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही चांगली सुविधा असली तरी शासनाच्या वेबसाईट अद्ययावत नसल्याने विविध समस्यांना विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागत आहे. समाजकल्याण विभागाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकडून राज्यातील विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेश, भारत सरकार शिष्यवृत्ती, फ्रीशीप, राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, सैनिकी शाळा शिष्यवृत्ती, विद्यावेतन योजना, परराज्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, ९ वी व १० वी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, सफाई व्यवसाय कामगारांकरिता शिष्यवृत्ती अशा विविध योजनांचे अर्ज आॅनलाइन पध्दतीने अर्ज भरण्याची सुविधा शासनाकडून देण्यात आली आहे. मात्र समाजकल्याण विभागाची वेबसाईट कायम मंदावत असल्याने विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा वाया जात आहे.अर्ज भरताना बॅकस्पेस मारल्यास अर्ज पुन्हा लवकर न उघडणे किंवा आपोआपच लॉगआउट होणे, पुन्हा लॉगइन करताना पासवर्ड किंवा युजरनेम चुकीचा संदेश येणे, एका ब्राउझरवर साईटवर लॉगइन झाल्यानंतर लॉगआउट किंवा बॅकस्पेस मारल्यास अर्जाचे पेज ओपन होत नाही. अशा वेळी दुसऱ्या ब्राउझरवर पुन्हा लॉगइन करावे लागणे अशा विविध अडचणी या वेबसाईटवर असल्याने विद्यार्थी हैराण झाले आहेत.