एमएचटी-सीईटीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:07 AM2021-06-09T04:07:47+5:302021-06-09T04:07:47+5:30

उदय सामंत यांची माहिती लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या, मात्र अद्याप मूल्यमापनाचा फॉर्म्युला जाहीर झालेला ...

Online application registration for MHT-CET begins | एमएचटी-सीईटीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू

एमएचटी-सीईटीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू

Next

उदय सामंत यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या, मात्र अद्याप मूल्यमापनाचा फॉर्म्युला जाहीर झालेला नाही. दरम्यान वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी या व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी नियमित सीईटीसाठी आता अर्ज करू शकतील. ८ जूनपासून सुरू झालेली ही अर्ज नोंदणी प्रक्रिया ७ जुलैपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करून दिली.

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशपरीक्षा आणि संपूर्ण प्रवेशप्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून नियोजन केले जात आहे. त्याचाच भाग म्हणून याच्या सीईटी परीक्षांची तयारी सुरू आहे. सदर अर्ज नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी https://t.co/qzMOaiWZnM या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले असून, सर्व पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीचा कार्यक्रम स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, तसेच याबाबत वेळापत्रक जाहीर केले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, मागील वर्षी ५ लाख ४२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी एमएचटी-सीईटीसाठीच्या पीसीएम आणि पीसीबी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

........................

Web Title: Online application registration for MHT-CET begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.