Join us  

ऑनलाइन बीयर पडली ९७ हजारांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 4:24 AM

गावदेवी येथील घटनागावदेवी येथील घटनालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ऑनलाइन बीयरसाठी ठाण्यातील नोकरदार तरुणाला ९७ हजार मोजावे ...

गावदेवी येथील घटना

गावदेवी येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ऑनलाइन बीयरसाठी ठाण्यातील नोकरदार तरुणाला ९७ हजार मोजावे लागल्याची घटना गावदेवी परिसरात घडली. या प्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ठाणे परिसरात राहणारे ३० वर्षीय तक्रारदार खासगी कंपनीत नोकरीला आहेत. ५ डिसेंबर रोजी रात्री ९ च्या सुमारास हे पत्नीसोबत गिरगाव चौपाटी येथे आले होते. तेथे जेवण उरकून, बीयर पाहिजे असल्याने जवळच्या वाइन शॉपसाठी सर्चिंग सुरू केले. त्याचवेळी गुगलवर जवळच निधी वाइन शॉपची माहिती मिळाली. त्यांनी नाना चौक परिसरात जाताच, त्यांना ते शॉप मिळून आले नाही. पुढे, त्यांनी गुगलवरील क्रमांकावरून संपर्क साधला. तेव्हा कॉलधारकाने वाइन शॉप सध्या बंद झाले असून बीयर पाहिजे असल्यास गोडावूनमधून आणून देतो, असे सांगितले. तरुणाने होकार देत, ठगाने पाठविलेल्या यू.पी.आय. आयडी क्रमांकावर ३२० रुपये ट्रान्सफर केले. पुढे नोंदणी करावी लागेल म्हणत क्यूआर कोड पाठवून स्कॅन करण्यास सांगितले. त्यांनीही विश्वास ठेवून स्कॅन करताच वेगवेगळ्या व्यवहारांत त्यांच्या खात्यातून रात्री साडेदहा ते बाराच्या दरम्यान ९७ हजार ६६८ रुपये काढण्यात आले. याबाबतचे संदेश मोबाइलवर धडकताच तरुणाला धक्का बसला. यात फसवणूक झाल्याने त्याने गावदेवी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार अधिक पोलीस तपास सुरू आहे.