Join us

‘आॅनलाइन वीजबिल भरणा अधिकृत एजन्सीकडेच करा’

By admin | Published: May 03, 2017 4:11 AM

वीजग्राहकांनी आॅनलाइन वीजबिल भरणा महावितरणद्वारे नियुक्त अधिकृत एजन्सीद्वारेच करावा, तसेच आॅनलाइन वीजबिल भरताना

मुंबई : वीजग्राहकांनी आॅनलाइन वीजबिल भरणा महावितरणद्वारे नियुक्त अधिकृत एजन्सीद्वारेच करावा, तसेच आॅनलाइन वीजबिल भरताना एखाद्या एजन्सीबाबत शंका आल्यास शहानिशा करून नंतरच वीजबिल भरावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.महावितरणने नियुक्त केलेले अधिकृत आॅनलाइन वीजबिल भरणा केंद्र राज्यात सर्वत्र उपलब्ध आहेत. या केंद्रांद्वारे वीजबिलांचा भरणा केला जातो. मात्र, काही ठिकाणी महावितरणचे परवानगी नसलेली अनधिकृत आॅनलाइन वीजबिल भरणा केंद्रे वीजबिलांचा भरणा करून घेतात व त्या पैशांचा भरणा महावितरणकडे करीत नाहीत, असे निदर्शनास आले आहे. अशा अनधिकृत केंद्रांमुळे ग्राहकाने वीजबिल भरूनही, त्याची नोंद महावितरणकडे होत नाही. त्यामुळे संबंधित वीजग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला जातो व त्याचा त्रास ग्राहकांना होतो. वीजग्राहकांनी आॅनलाइन बिल भरणा अधिकृत एजन्सीद्वारेच करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)प्रमाणपत्र पडताळणीराज्यभरात २ व ३ मे या कालावधीत महावितरणच्या विद्युत सहायक पदाच्या प्रतीक्षा यादीवरील ३ हजार ३४ उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी सुरू आहे.