सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी लागणार ऑनलाइन बुकिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 05:24 AM2020-11-16T05:24:28+5:302020-11-16T05:25:01+5:30

सोमवारपासून मंदिर खुले करत असल्याची माहिती देत श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदेश बांदेकर म्हणाले.

Online booking will be required for Siddhivinayak's darshan | सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी लागणार ऑनलाइन बुकिंग

सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी लागणार ऑनलाइन बुकिंग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिवाळीच्या पाडव्याला मंदिरे खुली होत असून, मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या सिद्धिविनायक मंदिरानेदेखील जय्यत तयारी केली आहे. सोमवारी सिद्धिविनायक मंदिर दर्शनासाठी खुले होत असले तरी सर्वप्रथम श्रीगणेशाचे दर्शन घेण्यासाठी सिद्धिविनायक टेम्पल अ‍ॅपवर ऑनलाइन बुकिंग करावे लागेल. बुकिंग झाल्यावरच भाविकांना श्रीगणेशाचे दर्शन घेता येईल.


सोमवारपासून मंदिर खुले करत असल्याची माहिती देत श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था असेल. आम्ही अ‍ॅपदेखील तयार केले आहे. याद्वारे दर्शनासाठी आगाऊ वेळ घेता येईल. अद्ययावत संगणकीय प्रणालीचा वापर करून यंत्रणा तयार केली आहे. सिद्धिविनायक टेम्पल अ‍ॅप डाऊनलोड करुन त्यावर भाविकाला त्यावर माहिती भरावी लागेल. त्यावर नियोजित वेळा आहेत. त्यानुसार बुकिंग केल्यावर क्यूआर कोड मिळेल. ठरल्या वेळी भाविकाला दर्शन मिळेल.


 काेराेना संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांनुसारच भाविकांची नोंद होईल. तापमान मोजले जाईल. मास्क बंधनकारक असेल. कोणीही गर्दी करू नये.* पहिल्या दिवशी एक हजार भाविकांना दर्शन पहिल्या दिवशी एक हजार भाविकांना दर्शन मिळेल. या भाविकांनी क्यूआर कोड जनरेट केलेला असेल. शांततेत दर्शन घ्या. मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा. ज्येष्ठ नागरिकांनी लाइव्ह दर्शन घ्यावे. परिस्थिती नियंत्रणात आली की मग ज्येष्ठ नागरिकांनी यावे. ऑनलाइन दर्शन २४ तास उपलब्ध आहे, असे बांदेकर यांनी सांगितले.  
मंदिरांचा निर्णय हे उशिरा सुचलेले शहाणपण 
मुंबई : महाराष्ट्रात सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करावीत यासाठी रिपब्लिकन पक्षाने राज्यभर आंदोलन केले होते. उशिरा का होईना पण चांगला निर्णय झाला, त्याचे आम्ही स्वागत करतो. सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये याची खबरदारी घेऊन सर्व नियम पाळून सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करावीत, ही रिपाइंची मागणी होती.
- रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री 

व्यावसायिकांना बिनव्याजी कर्ज द्यावे 
मार्च महिन्यापासून मंदिर बंद असल्यामुळे मंदिराच्या आवारातील छोटया व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. यात हार विक्रेते, प्रसाद विक्रेते अशा व्यावसायिकांचा समावेश आहे. मंदिरे सुरू झाल्यानंतर त्यांना त्यांचा व्यवसाय सुरु करायचा आहे. परंतु त्यांना व्यवसायासाठी भांडवलाची चणचण भासत आहे. सरकारने छोट्या व्यावसायिकांना तातडीने दहा हजार ते एक लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन करुन द्यावे,  यांच्याकडे  केली आहे. 
- प्रवीण दरेकर, विरोधी पक्ष नेते

Web Title: Online booking will be required for Siddhivinayak's darshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.