मुंबई : धारावी येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यान संस्थेतर्फे वन्यजीव सप्ताहा निमित्त फुलपाखरांचे ऑनलाईन छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
उद्यानात आढळून येणा-या फुलपाखरांच्या ऑनलाईन छायाचित्र प्रदर्शनात सर्व निसर्ग अभ्यासक आणि पर्यटक यांना फुलपाखरांबाबत माहिती मिळेल. आणि हाच या मागचा हेतू आहे. उद्यानात फुलपाखरांच्या १११ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. त्यातील काही निवडक फुलपाखरांची छायाचित्र या प्रदर्शनासाठी निवडण्यात आली आहेत.
प्रदर्शनासाठी प्रतिक मोरे, धनंजय राऊळ, प्रशांत गोकरणकर आणि मृणाल गोसावी यांनी छायचित्रे दिली आहेत. हे प्रदर्शन उद्यानाच्या www.maharashtranaturepark.org या संकेतस्थळ २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर पर्यंत पाहण्यास मिळेल.
दरम्यान, महाराष्ट्र निसर्ग उद्यान संस्था निसर्ग शिक्षण व जनजागृती करण्यामध्ये नेहमीच अग्रेसर राहिली आहे. गेल्या दोन वर्षांपासून उद्यानामार्फत वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे.