ऑनलाइन ठगाने पोलिसांसह डॉक्टरला फसवले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 05:41 AM2020-01-07T05:41:38+5:302020-01-07T05:41:43+5:30

केवायसी अपडेट करण्यासह पैसे रिफंड करण्याच्या नावाखाली डॉक्टरसह पोलिसांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे.

Online cheat deceives doctor with police | ऑनलाइन ठगाने पोलिसांसह डॉक्टरला फसवले

ऑनलाइन ठगाने पोलिसांसह डॉक्टरला फसवले

Next

मुंबई : केवायसी अपडेट करण्यासह पैसे रिफंड करण्याच्या नावाखाली डॉक्टरसह पोलिसांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायन आणि आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सायन येथील रहिवासी असलेले डॉक्टर महावीर यादव यांना केवायसी न केल्याने पेटीएम पुढल्या २४ तासात बंद होईल, अशी भीती घातली. पुढे, त्यांच्या मोबाइलवर संदेश धाडून त्यावरील लिंक उघडण्यास सांगितली. लिंक उघडून खात्यात पैसे जमा करताच त्यांच्या खात्यातून तब्बल एक लाख रुपये वळते करण्यात आले. त्यापाठोपाठ राज्य पोलीस दलात पोलीस शिपाई पदावर कार्यरत हेमंत सातर्डेकर यांनी आॅनलाइन घड्याळ मागवले. मात्र, ते न आवडल्याने त्यांनी ते परत केले. पैसे परत मिळावेत म्हणून त्यांनी संबंधित संकेतस्थळाच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधला. ठगाने त्यांच्याकडून कार्ड तपशील आणि ओटीपी(वन टाईम पासवर्ड) घेतले. त्यानंतर त्यांच्या खात्यातून ७० हजार रुपये काढले.

Web Title: Online cheat deceives doctor with police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.