Join us  

अभिवाचनाची ऑनलाइन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 4:24 AM

मुंबई : ग्रंथाली आणि व्हिजन व्हॉइस एन ॲक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने, ग्रंथाली वाचक दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयीन व खुल्या ...

मुंबई : ग्रंथाली आणि व्हिजन व्हॉइस एन ॲक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने, ग्रंथाली वाचक दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयीन व खुल्या गटाकरिता विनामूल्य ऑनलाइन अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रत्येक गटात केवळ १०० संघांनाच सामावून घेतले जाणार आहे. ही स्पर्धा सांघिक स्वरूपाची असून, यात सहभागी होणाऱ्या संघांमध्ये किमान दोन तर कमाल पाच कलाकार असतील. या स्पर्धेमध्ये कथा, कविता, आत्मृवत्त, वैचारिक लेख किंवा संमिश्र अशा कोणत्याही साहित्याचे वाचन करता येणार आहे. नाटक अथवा एकांकिका यामध्ये सादर करता येणार नाही. ही स्पर्धा ऑनलाइन असल्याने स्पर्धक संघांनी त्यांच्या अभिवाचनाचा १० ते १२ मिनिटांचा व्हिडीओ चित्रित करून त्याची गुगल ड्राइव्ह लिंक १८ डिसेंबरपर्यंत पाठवायची आहे.

महाविद्यालयीन गटाने विज्ञान कथा, विज्ञान लेख, वैज्ञानिक आत्मवृत्त अशा विज्ञानावर आधारित साहित्याचे अभिवाचन करावयाचे आहे, तर खुल्या गटासाठी कोणत्याही विषयाचे बंधन नाही.

अधिक माहिती व प्रवेश अर्जासाठी ग्रंथाली.कॉम/अभिवाचन२०२० या वेबपोर्टलला भेट देण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.