मलबार हिलमध्ये महिलेला ‘आॅनलाइन’ गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 05:44 AM2018-05-28T05:44:17+5:302018-05-28T05:44:17+5:30

बँक खात्याची परस्पर माहिती मिळवत, एका ठगाने कॅथलिक जिमखान्याच्या सचिवाच्या खात्यातून पैसे काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून आग्रीपाडा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

online Crime News | मलबार हिलमध्ये महिलेला ‘आॅनलाइन’ गंडा

मलबार हिलमध्ये महिलेला ‘आॅनलाइन’ गंडा

Next

मुंबई  - बँक खात्याची परस्पर माहिती मिळवत, एका ठगाने कॅथलिक जिमखान्याच्या सचिवाच्या खात्यातून पैसे काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून आग्रीपाडा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
आग्रीपाडा येथील बीआयटी चाळीमध्ये राहणाऱ्या वनिता चांदोरकर (४४) मरिन ड्राइव्ह येथील कॅथलिक जिमखाना येथे सचिव पदावर कार्यरत आहेत. त्यांचे गिरगावातील ठाकूरद्वार येथे असलेल्या देना बँकेच्या शाखेत सॅलरी अकाउंट आहे. ४ फेब्रुवारीला त्या घरी असताना रात्री साडेनऊच्या सुमारास बँकखात्यातून १0 हजार रुपये काढण्यात आल्याचा मॅसेज त्यांच्या मोबाइलवर आला. बघता-बघता खात्यातून पैसे काढले जाऊ लागल्याने चांदोरकर हडबडल्या. एटीएम कार्ड स्वत:जवळ असतानाही पैसे काढले जात असल्याने, त्यांनी तत्काळ बँकेच्या कस्टमर केअरकडे तक्रार करून खात्यातील सर्व व्यवहार बंद करण्यास सांगितले. मात्र, तोपर्यंत लुटारूने त्यांच्या खात्यातील ४0 हजार रुपये लंपास केले होते. दुसºया दिवशी सकाळी चांदोरकर यांनी बँकेत जाऊन चैकशी केल्यानंतर, बँकेतील अधिकाºयांनी त्यांची तक्रार नोंदवून घेत अंतर्गत तपास सुरू केला.
बँकेतील कर्मचाºयांनी चांदोरकर यांच्याकडून डिस्पूट फॉर्म भरून घेतला होता. त्यामुळे खात्यातून काढण्यात आलेले पैसे खात्यात पुन्हा जमा होतील, असे चांदोरकर यांना वाटले, परंतु अद्याप पैसे खात्यात परत जमा झाले नाहीत. म्हणून अखेर चांदोरकर यांनी आग्रीपाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अन्य तिघांचीही फसवणूक
- दुसºया घटनेमध्ये विरार पूर्वेकडील मनवेल पाडा येथील रेश्मा बायकर या आपले सहकारी देवकरण शर्मा आणि रिझवाना सौदागर यांच्यासोबत मलबार हिल परिसरात आल्या होत्या. त्या वेळी रोहित नामक व्यक्तीने फोनवर आपण वोडाफोन कंपनीतून बोलत असल्याचे सांगून, २0 हजार रुपयांचा पेटीएम बॅलन्स मोफत मिळणार असल्याची बतावणी केली. त्याच्या या बतावणीला रेश्मा आणि त्यांचे सहकारीही भुलले.

तिघेही आपल्या जाळ्यात अडकल्याचे लक्षात येताच, फोन करणाºया व्यक्तीने पेटीएम बॅलन्स भरण्याच्या नावाखाली तिघांच्याही बँक खात्यांची माहिती घेत, आनलाइन व्यवहारांद्वारे ९९ हजार रुपये लंपास केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, तिघांनीही मलबार हिल पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: online Crime News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.