मुंबई विद्यापीठात प्रथमच आॅनलाइन ई-एमबीए

By admin | Published: March 4, 2016 03:25 AM2016-03-04T03:25:44+5:302016-03-04T03:25:44+5:30

मुंबई विद्यापीठात पहिल्यांदाच आॅनलाइन ई-एमबीए (आॅनलाइन एक्झिक्युटीव्ह मास्टर आॅफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) हा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे

Online e-MBA for the first time in Mumbai University | मुंबई विद्यापीठात प्रथमच आॅनलाइन ई-एमबीए

मुंबई विद्यापीठात प्रथमच आॅनलाइन ई-एमबीए

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठात पहिल्यांदाच आॅनलाइन ई-एमबीए (आॅनलाइन एक्झिक्युटीव्ह मास्टर आॅफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) हा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. मुंबई विद्यापीठ आणि रशियाच्या फेडरल युनिव्हर्सिटी आॅफ ओराल यांच्यात गुरुवारी यासंदर्भातील सामंजस्य करार झाला आहे.
विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेमार्फत हा अभ्यासक्रम राबविला जाणार असून, या शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. यात एकूण १०४ क्रेडिट्स विभागून ठेवले जाणार आहेत. इतर देशातील विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे क्रेडिट स्वीकारण्याची मुभा या अभ्यासक्रमात दिली जाणार आहे. हा अभ्यासक्रम संपूर्णत: चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीमवर आधारित आहे. या २वर्षीय अभ्यासक्रमामध्ये एक वर्ष हा डिप्लोमा म्हणजेच पदविका या स्वरूपात असेल, तर पूर्णवेळ अभ्यासक्रम केल्यास २वर्षीय एमबीए ही पदवी दिली जाणार आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर या अभ्यासक्रमासाठी पात्र असेल. (प्रतिनिधी)

Web Title: Online e-MBA for the first time in Mumbai University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.