महापालिका शाळांमध्ये आॅनलाईन शिक्षण बंद, नगरसेवकांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 02:50 PM2020-09-21T14:50:30+5:302020-09-21T14:51:59+5:30

एकीकडे खाजगी शाळांमध्ये आॅनलाईन शिक्षण सुरु होऊन परिक्षाही झाल्या आहेत. परंतु दुसरीकडे ठाणे महापालिका शाळांमध्ये अद्यापही आॅनलाईन शिक्षण सुरुच झाले नसल्याची गंभीर समोर आली आहे. शिक्षण विभागाच्या या भोंगळ कारभारामुळे पुर्व प्राथमिक ते आठवी पर्यंतच्या २१ हजार ७८६ विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी आले आहे.

Online education closed in municipal schools, allegations of corporators | महापालिका शाळांमध्ये आॅनलाईन शिक्षण बंद, नगरसेवकांचा आरोप

महापालिका शाळांमध्ये आॅनलाईन शिक्षण बंद, नगरसेवकांचा आरोप

Next

ठाणे : कोरोनाच्या काळात खाजगी शाळांचे आॅनलाईन वर्ग सुरु झालेले आहेत. परंतु ठाणे महापालिकेच्या नववी आणि १० वीचे विद्यार्थी वगळता पूर्व प्राथमिक ते आठवीपर्यंतचे आॅनलाईन वर्ग घेतलेच जात नसल्याचा धक्कादायक आरोप नुकत्याच झालेल्या महासभेत सर्व पक्षीय नगरसेवकांनी केला आहे. शिक्षण विभागाच्या या भोंगळा कारभारामुळे २१ हजार ७८६ विद्यार्थ्यांचे भवितव्य मात्र अंधातरी आले आहे. याला जबाबदार कोण असा सवालही नगरसेवकांनी उपस्थित केला आहे.
              एकीकडे खाजगी शाळांचे आॅनलाईन वर्ग सुरु होऊन परीक्षा देखील सुरु झाल्या आहेत. परंतु दुसरीकडे ठाणे महापालिकाशाळांमध्ये आजही भोंगळ कारभार सुरु असल्याचा प्रत्यय आला आहे. महापालिकेच्या शहराच्या विविध भागात बालवाडी ते माध्यमिक शाळा चालविण्यात येतात. त्यामध्ये मराठी, इंग्रजी, उर्दू, गुजराती आणि हिंदी माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये झोपडपटटी भागातील सर्वसामान्य कुटंबातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु यंदा या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष शिक्षण विभागाच्या चुकीमुळे वाया जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोरोना वाढता प्रभाव डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनाने अद्यााप शाळा सुरु करण्यास परवानगी दिलेली नाही. असे असले तरी आॅनलाईनद्वारे शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार शहरातील शहरातील खाजगी शाळा सुरु झाल्याअसून काही शाळांच्या परीक्षाही झाल्या आहेत. खाजगी शाळांच्या बाबतीत असे चित्र असतांना ठाणे महापालिका शाळांमध्ये मात्र अद्यापही आॅनलाईन वर्गच सुरु झालेले नाहीत. नुकत्याच झालेल्या महासभेत राष्टÑवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी याबाबत मुद्दा उपस्थित केला. केवळ नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना युट्युब आणि ेआॅनलाईनद्वारे शिक्षण देण्यास सुरु वात झाली आहे परंतु उर्वरीत पुर्व प्राथमिक पासून ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षण सुुरु करण्यात आली नसल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला. त्यामुळे या वर्गांमध्ये शिक्षण घेत असलेल्या तब्बल २१ हजार ७८६ विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी आले आहे.
परंतु दुसरीकडे शिक्षण विभागाने मात्र याबाबत इन्कार केला आहे. प्राथमिक आणि माध्यमिकमध्ये काही प्रमाणात आॅनलाईन शिक्षण सुरु आहे. महापालिका शाळेतील शिक्षकांना करोनाच्या पाश्र्वाभूमीवर सात दिवस सर्वेक्षणाचे काम करतात आमि पुढचे सात दिवस त्यांना सुट्टी देण्यात येते. ज्यावेळेस शिक्षक करोना सर्वेक्षणाचे काम करतात, त्यावेळेस ते व्हॉटस अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासंबंधी चित्रफीत पाठवित असतात. तर, सात दिवस सुट्टी असते, त्यावेळेस झुम किंवा गुगल मीटद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण देतात, अशी माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली. तर, महापालिका शाळेत येणारा विद्याार्थी गरीब असतो. त्यांच्याकडे मोबाईल, लॅपटॉप आणि इंटरनेट सुविधा असते का, असा प्रश्न विरोधी पक्ष नेत्या प्रमिला केणी यांनी उपस्थित केला. त्यानंतर शाळेमध्ये आॅनलाईन शिक्षण सुरु च नसल्याचे उघड होताच सर्वपक्षीय नगसेवक आक्र मक झाले. अखेर महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण कसे देता येईल, या सर्वांनीच विचार करून शिक्षण विभागाला तसा नवा पर्याय सुचवावा, अशी सुचना महापौर नरेश म्हस्के यांनी दिली.
 

Web Title: Online education closed in municipal schools, allegations of corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.