मुंबई : मोबाईल कंपनीच्या मुख्यालयातून बोलत असल्याची बतावणी करून ठगाने एका महिला डॉक्टरला ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडले व तिच्या खात्यातील ४१ हजार रुपयावर ऑनलाइन डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलीस अधिक तपास करीत आहेत.
.............................................
बँकेला कोट्यवधी रुपयांचा गंडा
मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन कर्ज घेत ते परत न करता बँकेची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
२०१८ ते २०२० दरम्यान बँकेकडून दलाल संतोष कांबळे याच्यामार्फत मोटर्स कंपनीच्या अंधेरी, ओशीवरा येथील खात्यात १ कोटी ६४ लाख ८० हजार रुपये जमा करण्यात आले होते. अशाप्रकारे एकूण १३ ग्राहकांना त्याने ऑटो लोन दिल्याचे निदर्शनास आले. तपासणीत कोणतीही वाहने खरेदी न करताच कर्ज घेण्यात आल्याचे उघडकीस आले.
................................................
वांद्रेतून सराईत गुन्हेगाराला अटक
मुंबई : गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने वांद्रे परिसरातून ३८ वर्षीय सराईत गुन्हेगाराला देशीकट्टा आणि दोन जिवंत काडतुसांसह अटक केली. त्याच्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्नासह असे विविध नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
..........................................