Join us  

कोविडही गणितात ‘ढ’; ऑनलाइन शिक्षणामुळे विषय समजणे कठीण, युक्त्यांवर अधिक भर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 5:45 AM

६७ टक्के विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या मार्गदर्शनाशिवाय गणिते सोडविणे कठीण वाटत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई : कोरोना काळात शाळा बंद झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जात होते; मात्र ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे अनेक विद्यार्थ्यांना गणित समजणेच कठीण झाल्याची बाब ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या ब्रेनली या व्यासपीठामार्फत गणित दिनाचे औचित्य साधून केलेल्या सर्वेक्षणातून हाती आली आहे. 

ब्रेनलीच्या सर्वेक्षणानुसार, ६७ टक्के विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या मार्गदर्शनाशिवाय गणिते सोडविणे कठीण वाटत आहे. तर, ६९ टक्के विद्यार्थ्यांना ऑफलाइनपेक्षा ऑनलाइन गणित शिकणे अधिक आव्हानात्मक वाटत आहे. या सर्वेक्षणात सुमारे १७०० विद्यार्थ्यांनी मते नोंदवली. गणित विषय आवडत असल्याचे दर चारपैकी तीन विद्यार्थ्यांनी सांगितले असले तरीही आता प्रत्येकासाठी अवघड वाटू लागला आहे. गणित संकल्पना ऑनलाइनवर पद्धतीने सोप्या व सहज पद्धतीने कशा शिकवायच्या, असा प्रश्न त्यांना पडला आहे. कोविड काळात ७४ टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाइनवर गणित सोडविण्याच्या युक्त्या, टप्पे शोधून काढल्याने गणित थोडे सोपे झाल्याचे म्हटले आहे.

प्रत्यक्षातील मजा ऑनलाईनवर नाही

- गणितात अनेक भौमितिक सिद्धांत, समीकरणे असतात, बीजगणितीय सूत्रे फळ्यावर टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना समजावून शिकवावी लागतात. 

- त्यातल्या शंका प्रत्यक्ष दाखविल्याशिवाय समजून घेणे विद्यार्थ्यांना शक्य नसल्याने हे विषय ऑनलाइन शिकविणे शक्य नसल्याचे मत शिक्षक, मुख्याध्यापकांनी व्यक्त केले आहे. गणित आवडता विषय आहे. 

- ऑनलाइन शिक्षण सुरू झाल्यापासून शिक्षकांसोबत गणित प्रत्यक्षात शिकताना जी मजा येत होती, ती आता येत नाही, विषय कंटाळवाणा वाटत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. 

टॅग्स :मुंबई