ऑनलाईन शिक्षण केवळ पर्याय तो मर्यादितच असणे आवश्यक ... !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 05:12 PM2020-06-18T17:12:54+5:302020-06-18T17:13:21+5:30

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ मेन्टल हेल्थ अँड न्यूरोसायन्ससंस्थेचे पालकांच्या प्रश्नावर उत्तर

Online learning should be limited to options only ...! | ऑनलाईन शिक्षण केवळ पर्याय तो मर्यादितच असणे आवश्यक ... !

ऑनलाईन शिक्षण केवळ पर्याय तो मर्यादितच असणे आवश्यक ... !

googlenewsNext


मुंबई : लॉकडाऊनच्या काळात मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये आणि ते सुरु रहावे यासाठी ऑनलाईन शिक्षणाचे सर्वत्रीकरण होऊ लागले आहे. त्यासाठी काही मार्गदर्शक सूचना ही निर्देशित केल्या गेल्या आहेत. मात्र काही शैक्षणिक संस्थांकडून त्यांचे उल्लंघन केले जात असल्याने खऱ्या अर्थाने मानसिक व शारीरिक दृष्ट्या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ लागल्याकजी माहिती बंगळुरू येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ मेन्टल हेल्थ अँड न्यूरोसायन्स या संस्थेकडून जारी करण्यात आली आहे.  ३ ते १५ वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांना रोज २ ते ४ तास ऑनलाईन शिक्षण सक्तीचे करावे का असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला होता. दरम्यान देशभरात सर्व शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षणाचा आग्रह सुरू असताना सलग अनेक तास ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हानीकारक ठरेल असे उत्तर या संस्थेकडून मांडण्यात आले आहे. या प्रश्नाला उत्तर देताना संस्थेने ऑनलाईन शिक्षणासाठी साधनांची उपलब्धता, आरोग्यावरील परिणाम, सायबर गुन्हे असे मुद्दे संस्थेने उपस्थित केले आहेत.  

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या काळात ऑनलाईन शिक्षणाकडे पर्याय म्हणून पाहण्याची गरज आहे. मात्र शाळांकडून शुल्क वसुलीसाठी ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे चार ते पाच तास शिकवण्या सूर्य सल्याचे समोर येत असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या आहेत. अशा वेळी अशा शाळांवर सक्तीची कारवाई करण्याची मागणी पालक करत आहेत. ऑनलाईन  शिक्षण काळाची आवश्यकअसले तरी  या नव्या शिक्षण पद्धतीचा विद्यार्थ्यांवर नेमका काय परिणाम होणार याबाबत पालकांमध्ये संभ्रम आहे. त्याचा विद्यार्थ्यांच्या स्वास्थ्यावर काय परिणाम होतो आहे याची चाचपणी शासनाकडून केली जात नसल्याचा दावा या आधी ही इंडिया वाईड पेरेंट्स असोसिएशनकडून करण्यात आला आहे.

दरम्यान असोसिएशनने बंगळुरूच्या  नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ मेन्टल हेल्थ अँड न्यूरोसायन्स या संस्थेच्या अहवालाची प्रत सादर करत ऑनलाईन शिक्षणात इतक्या तासांची सक्ती का असा सवाल केला आहे. या संस्थेने ऑनलाईन शिक्षणाचे काही दुष्परिणाम मांडले असून त्यानुसार सध्याच्या परिस्थितीत ऑनलाईन शिक्षण हे सर्वात सोयीचे माध्यम आहे. मात्र, ऑनलाईन शिक्षणाची सुविधा साधने उपलब्ध नसल्यामुळे सर्व मुलांना मिळू शकत नाही. निश्चितच ऑनलाईन लर्निंगमुळे विद्यार्थ्यांच्या स्क्रीनटाईममध्ये वाढ होऊन त्यांच्या मानसिक आरोग्यावर याचा परिणाम होऊ शकतो.  यातून सायबर गुन्ह्य़ांचे वाढते प्रमाण, मुलांचा छळ अशा घटना विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरू शकतात. शाळांमध्ये सामाजिक बंध , संवाद निर्माण होत असतो मात्र ऑनलाईनच्या सततच्या सहवासामुळे मुले एकलकोंडी बनू शकतात अशी भीती ही व्यक्त करण्यात आली आहे.

कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीत आणखी काही महिने शाळा सुरु होणार नाहीत. या पार्श्वभूमीवर आणखी काही महिने शाळा सुरु करता येणार नसल्याने या काळात ऑनलाईन शिक्षणाला पर्याय नाही. मात्र शिक्षण संस्थांनी ठराविक , मर्यदित कालावधीत ऑनलाईन शिक्षणाचे नियोजन केले तर अनेक दुष्परिणाम टाळता येतील अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे.

Web Title: Online learning should be limited to options only ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.