Join us

मधू लिमये जन्मशताब्दीनिमित्त ऑनलाइन व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 4:07 AM

मुंबई : भारताच्या समाजवादी चळवळीचे राष्ट्रीय नेते आणि विचारवंत मधू लिमये यांचे जन्मशताब्दी वर्ष १ मे २०२१ पासून सुरू ...

मुंबई : भारताच्या समाजवादी चळवळीचे राष्ट्रीय नेते आणि विचारवंत मधू लिमये यांचे जन्मशताब्दी वर्ष १ मे २०२१ पासून सुरू होत आहे. त्या निमित्ताने शनिवारी सायंकाळी सहा वाजता ख्यातनाम विचारवंत व राजकीय भाष्यकार डॉ. प्रताप भानू मेहता यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ऑनलाइन पद्धतीने झूम ॲप आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ‘भारतीय लोकशाही समोरील आव्हाने’ या विषयावर प्रताप भानू मेहता आपले विचार मांडणार आहेत.

मधू लिमये त्यांच्या कार्याला उजाळा देण्याच्या निमित्ताने आज देशासमोरील विविध राजकीय, सामाजिक, आर्थिक इ. प्रश्नांवर तज्ज्ञ व्यक्तींची भाषणे, परिसंवाद, चर्चा इ. माध्यमातून वर्षभर प्रभावी जनमत तयार करण्याच्या उद्देशाने राज्य पातळीवर माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीमध्ये माजी खासदार हुसेन दलवाई, माजी खासदार डॉ व्यंकटेश काब्दे, सुभाष लोमटे, क्रांतीभाई शाह यांच्यासह राज्यातील बहुतेक जिल्ह्यातील प्रगतीशील व्यक्ती व संस्थांचा समावेश करण्यात आला आहे.