महाडच्या सांडपाणी केंद्रात आॅनलाइन मॉनिटरिंग
By admin | Published: July 4, 2015 11:45 PM2015-07-04T23:45:10+5:302015-07-04T23:45:10+5:30
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदशक तत्त्वानुसार राज्यातील सर्व सामायिक सांडपाणी केंद्रांना ३० जून २०१५ पर्यंत आॅनलाइन मॉनिटरिंग यंत्रणा बसवून ती कार्यान्वित
महाड : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदशक तत्त्वानुसार राज्यातील सर्व सामायिक सांडपाणी केंद्रांना ३० जून २०१५ पर्यंत आॅनलाइन मॉनिटरिंग यंत्रणा बसवून ती कार्यान्वित करणे अनिवार्य करण्यात आलेले होते. त्यानुसार अशा प्रकारची आॅनलाइन मॉनिटरिंग यंत्रणा महाड औद्योगिक वसाहतीमधील सामायिक सांडपाणी केंद्रात सुरू करण्यात आलेली असून या यंत्रणेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्रात अशा प्रकारची अद्ययावत यंत्रणा सर्वप्रथम सुरू करण्याचा मान महाडच्या सामायिक सांडपाणी केंद्राला मिळाल्याबद्दल प्रदूषण नियंत्रण मंडळाने समाधान व्यक्त केले.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या या कार्यप्रणालीमुळे सामायिक सांडपाणी केंद्रात प्रक्रिया केल्यानंतर बाहेर जाणाऱ्या सांडपाण्यामध्ये सीओडी, बीओडी, टीएसएस इ. घटकांचे प्रमाण किती आहे. याबाबतचा अहवाल चोवीस तास प्रदर्शित होणार आहे. ही यंत्रणा सर्व्हरद्वारे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्यालयाशी थेट जोडण्यात आलेली आहे. महाडच्या सीईटीपी केंद्रात बसवण्यात आलेल्या या यंत्रणेचा शुभारंभ एमएमएसीईटीपीचे अध्यक्ष एस. बी. पठारे, उपाध्यक्ष अशोक तलाठी, सदस्य राजेंद्र शेठ, प्रदूषण मंडळाचे क्षेत्र अधिकारी लाटे, वसावे, व्यवस्थापक संजय पाटील, प्लांट मॅनेजर गोविंद गारोले, मेंटेनन्स मॅनेजर समीर शेख आदी उपस्थित होते. (वार्ताहर)