Join us

सिझेरियनच्या माहितीसाठी ‘आॅनलाइन’ याचिका दाखल

By admin | Published: June 27, 2017 3:40 AM

सरकारने राज्यातील नर्सिंग होम, खासगी आणि सरकारी रुग्णालयांत होणाऱ्या ‘सिझेरियन’ प्रसूतींची आकडेवारी द्यावी, अशी आॅनलाइन

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सरकारने राज्यातील नर्सिंग होम, खासगी आणि सरकारी रुग्णालयांत होणाऱ्या ‘सिझेरियन’ प्रसूतींची आकडेवारी द्यावी, अशी आॅनलाइन याचिका ‘बर्थ इंडिया’ या संस्थेने दाखल केली आहे. संस्थेच्या सुवर्णा घोष यांनी ही आॅनलाइन याचिका दाखल करून, माहिती देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांना केले आहे.२०१० ते २०१५ या काळात मुंबईतील खासगी आणि सरकारी रुग्णालयातील सिझेरियन प्रसूती दुप्पट झाल्याचे या संस्थेने निदर्शनास आणले होते. माहितीच्या अधिकारातील आकडेवारीनुसार २०१० साली सिझेरियनचे प्रमाण १६.७ टक्के होते. २०१५ साली हेच प्रमाण ३२.१ टक्क्यांपर्यंत पोहोचले. एवढेच नव्हे, तर सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत खासगी रुग्णालयांतील सिझेरियन झालेल्या महिलांची संख्या २०० टक्क्यांहून जास्त आहे.सुवर्णा घोष यांनी दाखल केलेल्या याचिकेला देशातून दीड लाखांहून अधिक जणांनी पाठिंबा दिला आहे. त्याची दखल घेत, केंद्रीय महिला व बालकल्याण विभागाने ‘सीजीएचएस’ प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱ्या रुग्णालयांच्या अटींमध्ये त्यांना सिझेरियन प्रसूतींची माहिती जाहीर करणे बंधनकारक असल्याची अट समाविष्ट केली आहे. सुवर्णा घोष यांच्या म्हणण्यानुसार, सरकारी रुग्णालयांतील सिझेरियनच्या आकडेवारीमुळे या भागातील महिलांच्या आरोग्याचे प्रश्न निदर्शनास येतील आणि त्यानुसार, उपाययोजना करणे सोपे जाईल.