ऑनलाइन याचिकेला परदेशातून बळ
By admin | Published: November 11, 2014 02:03 AM2014-11-11T02:03:59+5:302014-11-11T02:03:59+5:30
पाथर्डी हत्याकांडाविरोधातील ऑनलाइन याचिकेला आता सातासमुद्राच्या पलीकडे जाऊनही पाठिंबा मिळत आहे. जवखेडाचा प्रश्न हा काही वर्गापुरता मर्यादित नसून हे अमानुष कृत्य आह़े
Next
मुंबई : पाथर्डी हत्याकांडाविरोधातील ऑनलाइन याचिकेला आता सातासमुद्राच्या पलीकडे जाऊनही पाठिंबा मिळत आहे. जवखेडाचा प्रश्न हा काही वर्गापुरता मर्यादित नसून हे अमानुष कृत्य आह़े त्यामुळे याचा निषेध नोंदविण्यासाठी या ऑनलाइन याचिकेला परदेशातील जागरूक नागरिकांचीही साथ मिळत आहे.
मराठी अभ्यास केंद्राने जवखेडा खालसा या गावात झालेल्या जाधव कुटुंबीयांच्या निर्घृण हत्येचा निषेध एका ऑनलाइन याचिकेद्वारे नोंदविला आहे. या ऑनलाइन याचिकेला 85क् हून अधिक लोकांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यात भारतातील आणि भारताबाहेरील विविध क्षेत्रंतील व्यक्तींचा समावेश आहे. त्यात संयुक्त अरब अमिराती येथून भगवान गवई, स्वप्नील मेश्रम, गौरव रामटेके, संदीप कड, सहदेव येदे, प्रशांत तोरणो, श्याम कासारे, तुषार मांडलिक, संतोष गुरव, भावेश व्यास, जितेंद्र कंठे तर अमेरिकेतून जयश्री पाटील, अनिता खुडे, अनिल हंबीर, मेजर अहमद, गौतम हिरवे, नीलेश अघम, प्रकाश यादव, प्रदीप सोनावणो, प्रतिभा शिंदे, सोनाली कांबळे, अविनाश राऊत, डॉ. संतोष सांगरे, विजय पवार, समाप्ती गुहा यांनी याचिकेला ऑनलाइन लढय़ात सहभाग दर्शविला आहे. शिवाय कॅनडामधून डॉ. रुबेन लुईस गॅब्रिएल, रवींद्र इंजल, इंग्लंडहून भारूलता कांबळे, सागर पाबळे, बेरील विल्यम्स, पिर्थी काईले, जर्मनीतील प्रशांत निळकुंड, ऑस्ट्रेलियाचे अभय भोसेकर, सिंगापूरचे आप्पासाहेब नाईकळ आणि श्रीलंकेचे बंदुला डिसिल्वा यांनीही ऑनलाइन याचिकेवर नोंदणी करीत निषेध नोंदविला आहे. याशिवाय विविध क्षेत्रंतील मंडळींनीही पाठिंबा दिला आहे. (प्रतिनिधी)