Join us

नव्या वीज जोडणीसाठी आॅनलाईन प्रक्रिया बंधनकारक

By admin | Published: April 22, 2016 2:19 AM

बेस्ट उपक्रमाच्या नवीन जोडणी अर्जासंबंधीच्या कामकाजात पारदर्शकता यावी. कामे त्वरित आणि सोयीस्कर व्हावीत या उद्देशाने भविष्यात नवीन वाणिज्यिक औद्योगिक वर्गावरीतील नवीन

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या नवीन जोडणी अर्जासंबंधीच्या कामकाजात पारदर्शकता यावी. कामे त्वरित आणि सोयीस्कर व्हावीत या उद्देशाने भविष्यात नवीन वाणिज्यिक औद्योगिक वर्गावरीतील नवीन जोडणी अर्ज व ज्यांची वीज पुरवठा मागणी १०० किलोवॅटपेक्षा अधिक आहे. अशा वीज ग्राहकांचे मागणी अर्ज आता केवळ आॅनलाईन पद्धतीनेच स्वीकारण्यात येणार आहेत.वीज ग्राहक विभागातील सर्व प्रभागात वरील वर्गवारीतील वीज ग्राहकांचे भार व नवीन मागणीसाठी हस्तलिखित अर्ज स्वीकारण्याचे काम त्वरित बंद करण्यात आले आहे. वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील वीज ग्राहक ज्यांचा भार १०० किलोवॅटपेक्षा अधिक आहे. अशा वीज ग्राहकांना नवीन मागणी अर्ज केवळ आॅनलाईन पद्धतीनेच पाठवणे बंधनकारक असणार आहे. वीज ग्राहकांना अर्जाची नोंदणी करताना अर्ज छाननी शुल्क, जोडणी शुल्क आणि सुरक्षा अनामत रक्कम ही शुल्के नियमानुसारच भरावी लागणार आहेत. शिवाय आॅनलाईन अर्ज करताना जागेच्या वापरासंबंधीचा पुरावा, कंपनी व फर्म संबधित अधिकार कागदपत्रे वीज ग्राहकाला अपलोड करणे बंधनकारक असणार आहे. अशा प्रकारे अर्ज केलेल्या अर्जदारांच्या अर्जाची त्वरित छाननी करण्यात येणार असून, त्यांना पंधरा दिवसांत वीज पुरवठा मिळणार आहे, असे बेस्टने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)