Join us

घराच्या हस्तांतरणासह भाड्याच्या तक्रारी ऑनलाइन करा, दलालांच्या तावडीतून होणार सुटका

By सचिन लुंगसे | Published: August 21, 2024 10:20 AM

झोपू प्राधिकरणाच्या भाड्याबाबत तक्रारींकरिता झोपडीधारकाना यापूर्वी प्राधिकरणात तक्रार अर्ज भरून द्यावा लागत होता.

मुंबई : एसआरए योजनेतील झोपडीधारकाना घरबसल्या आता सदनिका हस्तांतरण करता येणार असून, आपल्या भाड्याबाबत तक्रारीही ऑनलाइन नोंदविता येणार आहे. झोपडपटटी पुनर्वसन प्राधिकरणाने यासंदर्भातील ऑनलाईन सेवा सुरु केली असून, यामुळे लोकांची दलालांच्या तावडीतूनही सुटका होणार आहे.

झोपू प्राधिकरणाच्या भाड्याबाबत तक्रारींकरिता झोपडीधारकाना यापूर्वी प्राधिकरणात तक्रार अर्ज भरून द्यावा लागत होता. सदनिकेच्या (खरेदी/विक्री) हस्तांतरणाकरिता देखील हस्तांतरण फॉर्म भरुन द्यावा लागत होता. यासाठी वांद्रे येथील एसआरएच्या मुख्यालयात चकरा माराव्या लागत होत्या. तर अनेकदा दलालांची मदत घ्यावी लागत होती. एसआरएचे  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून यासर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. आता झोपडीधारकांची त्रासातून सुटका होऊन त्यांची होणारी फसवणूक रोखली जाणार आहे.

झोपू योजनेतील झोपडीधारकाना घरबसल्या आता सदनिका हस्तांतरण करता येणार असून, आपल्या भाड्याबाबत तक्रारीही ऑनलाइन नोंदविता येणार आहे. योजनेतील लाभार्थ्यांना एसआरएच्या www.sra.gov.in या वेबसाइटवर सदनिका/गाळा हस्तांतरण तसेच भाडेबाबत तक्रारीसाठी ऑनलाईन नागरी सेवा सुरू करण्यात आली आहे. झोपु प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नागरी सेवा या पयार्याचे बटण दाबून भाडे तक्रारींकरिता भाडे व्यवस्थापन प्रणाली आणि सदनिका हस्तांतरणाकरिता सदनिका/गाळ्याचे हस्तांतरण या पयार्यावर जाऊन प्रक्रिया पार पाडता येणार आहे.

टॅग्स :मुंबई