Join us

सोशल साइट्सवर आॅनलाइन सेल्सचा धडाका  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 7:28 AM

चौकाचौकातून आणि वर्तमानपत्रातून ग्राहकपेठांच्या खरेदीपेठांच्या जाहिराती सुरू झाल्या की, दिवाळीची चाहूल सगळ्या बाजारपेठेला लागते.

मुंबई : चौकाचौकातून आणि वर्तमानपत्रातून ग्राहकपेठांच्या खरेदीपेठांच्या जाहिराती सुरू झाल्या की, दिवाळीची चाहूल सगळ्या बाजारपेठेला लागते. आॅनलाइनच्या बाजारपेठेतदेखील दिवाळीची चाहूल ही अशीच वेगवेगळ्या सेलमुळे लागताना जाणवत आहे. फ्लिपकार्ट, स्नॅपडील अशा आघाडीच्या आॅनलाइन पोर्टल्सनी सध्या आॅनलाइन सेलचा धमाकाच सुरू केला आहे. जवळपास सर्वच आॅनलाइन पोर्टलवर धमाकेदार सेल्स सुरू आहेत.आपल्या वेबसाइटवर जगभरातील ब्रँडचा भडिमार केला जात आहे आणि हा सेल संपताच पुन्हा दिवाळी धमाका वीक सुरू होणार आहे. एकंदरीतच प्रत्येक पोर्टल येनकेनप्रकारे ग्राहकाला आकर्षित करू पाहात आहे. एके काळी केवळ पुस्तक, इलेक्ट्रॉनिक्सवर असणारा कल, आज लाइफ स्टाइल उत्पादनांकडे वळला आहे. कपडे आणि दागिने हा भारतीय महिलांचा दीर्घकाळ चालणारा आणि सर्वात आवडीचा खरेदी पर्याय. कापडाचा पोत, डिझाइन अशी हजारो प्रकारे चिकित्सा करून, मगच त्यांची खरेदी पूर्ण होते. त्यामुळे या वस्तू भारतात आॅनलाइन विकल्या जाणे अशक्यच आहे, असादेखील एक सूर सुरुवातीच्या काळात होता. मात्र, आज त्यावर वेगवेगळे पर्याय, क्लृप्त्या शोधून आॅनलाइन कपड्यांच्या विक्रीतदेखील आॅनलाइन पोर्टल यशस्वी होताना दिसत आहेत. अर्थातच, हे सारे भारतीय मानसिकतेला धरून डिझाइन केलेले व्यापाराचे नवे मॉडेल आहे.आज अनेक छोट्या-मोठ्या आॅनलाइन व्यापार व्यवस्थेचे एकत्रीकरण होताना दिसते. किंबहुना, अशा प्रकारच्या डेटावर आधारित व्यवसाय करणे, हा भविष्यातील सर्वात मोठा व्यवसाय ठरणार आहे. जागतिक स्तरावर बिग डेटा मार्केटची उलाढाल २०१५ पर्यंत तब्बल २५ बिलियन डॉलरच्या आसपास जाण्याची शक्यता नासकॉमच्या अहवालात नोंदविण्यात आली आहे. आॅनलाइनचे हे फॅड भारतीय ग्राहकाच्या टिपिकल आणि परंपरागत मानसिकतेला अजिबात झेपणारे नव्हते. तरीदेखील आज भारतातील ई-कॉमर्समध्ये तब्बल ८८ टक्के इतकी वाढ झाली आहे. ही आकडेवारीच आपल्या बाजारपेठेत आॅनलाइन शॉपिंग किती आणि कसे रुजले आहे, याची जाणीव करून देते. दुकानात जायचे, वस्तू हाताळायची, चार पैशांची घासाघीस करायची आणि वस्तू विकत घ्यायची, या पारंपरिक खरेदीकडून आजच्या ग्राहकांचे शॉपिंग दुकानातून बाहेर पडून, घरातील डेस्कटॉपच्या विंडोमध्ये किंवा मोबाइलमध्ये विसावले आहे.जागतिक स्तरावर बिग डेटा मार्केटची उलाढाल २०१५ पर्यंत तब्बल २५ बिलियन डॉलरच्या आसपास जाण्याची शक्यता नासकॉमच्या अहवालात नोंदविण्यात आली आहे. आॅनलाइनचे हे फॅड भारतीय ग्राहकाच्या मानसिकतेला अजिबात झेपणारे नव्हते.

टॅग्स :मुंबई