Join us

आॅनलाइन घोटाळा; अधिका-यांना घरी पाठवा, डिजिटलचा मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 6:21 AM

मुंबई : २५ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील सर्व शेतक-यांना कर्जमाफी मिळेल असे सांगतानाच डिजिटल महाराष्ट्राच्या नावाखाली आॅनलाइन अर्ज मागवण्याचा फंडा सरकारने काढला.

मुंबई : २५ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील सर्व शेतक-यांना कर्जमाफी मिळेल असे सांगतानाच डिजिटल महाराष्ट्राच्या नावाखाली आॅनलाइन अर्ज मागवण्याचा फंडा सरकारने काढला. तर सहकारमंत्र्यांनी आॅनलाइन प्रक्रियेत घोटाळा झाल्याचे स्पष्ट केले. प्रधान सचिव विजय गौतम यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. केवळ एवढ्यावर हा प्रश्न सुटणार नाही, शेतक-यांना मनस्ताप देणा-या अधिका-यांना घरचा रस्ता दाखवा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.राज्यातील शेतकºयांना कर्जमाफी देण्याचे खोटे आश्वासन सरकारने दिले. हे आश्वासन खोटे असल्यामुळेच त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात आली नाही. ओबीसी, एस्सी, एसटी समाजातील विद्यार्थ्यांचे अर्जदेखील आॅनलाइन मागवण्यात आले. परंतु या आॅनलाइन प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या मिळालेल्या नाहीत. सरकारने डिजिटलसाठी केलेला हा प्रयत्न फसला आहे. यामुळे समाजातील सर्व घटक वंचित राहिले आहेत, असा आरोप तटकरे यांनी केला.डिजिटलमुळे शेतकरी, विद्यार्थी यापैकी कोणालाही फायदा झालेला नाही. उलट विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यताच अधिक असल्याचे निदर्शनास येत आहे. तटकरे यांनी हल्लाबोल आंदोलनाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. १२ डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्ष नागपूरमध्ये एकत्र येणार असून शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे.

टॅग्स :ऑनलाइनडिजिटल