कोरोनाविरोधात ऑनलाइन सेमिनार, लोकमत बेस्ट सोसायटी अॅवॉर्ड्स
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 01:46 AM2020-04-30T01:46:31+5:302020-04-30T01:46:42+5:30
म्हणून ‘लोकमत बेस्ट सोसायटी अॅवॉर्ड्स ’अंतर्गत ‘लोकमत’नेदेखील मुंबईमधील सोसायट्यांना अधिकाधिक खबरदारी, सुरक्षा बाळगण्याचे आवाहन करत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई : कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अनेक योजना आखल्या जात आहेत. अनेक प्रयोग राबविले जात आहेत. याच उपाययोजनांचा एक भाग म्हणून ‘लोकमत बेस्ट सोसायटी अॅवॉर्ड्स ’अंतर्गत ‘लोकमत’नेदेखील मुंबईमधील सोसायट्यांना अधिकाधिक खबरदारी, सुरक्षा बाळगण्याचे आवाहन करत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. लोकमत बेस्ट सोसायटी अॅवॉडर््स या पुरस्कारांतर्गत आता ‘लोकमत’ने एक वेगळा विभाग केला असून, जी सोसायटी कोरोनाला हरविण्यासाठी जोमाने प्रयत्न करेल; त्या सोसायटीला विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, अशी घोषणाच ‘लोकमत’ने केली असतानाच आता ‘लोकमत’ने कोरोनाला हरविण्यासाठी उत्तम काम करत असलेल्या सोसायटीला सलाम करत मार्गदर्शन करण्यासाठी एका आॅनलाइन सेमिनारचे आयोजन केले आहे.
प्रिय हाऊसिंंग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनो, आम्हाला माहिती आहे की, आपण आपल्या सोसायटीतील रहिवाशांचे रक्षण करण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांचे जीवन सुलभ करण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहात. आम्ही तुमच्या प्रयत्नांना सलाम करतो. आपल्याला मदत करण्यासाठी लोकमत बेस्ट सोसायटी पुरस्कार आणि महासेवा एकत्रितपणे गृहनिर्माण संस्थांसाठी सद्यस्थितीत कोरोना परिस्थितीशी जुळवून घ्यावयाच्या सर्वोत्तम पद्धतीबाबत आॅनलाइन सेमिनार आयोजित करण्यात येत आहे. प्रीती किचन अप्लायन्सेसद्वारा समर्थीत सारस्वत बँकेद्वारे हे सेमिनार सादर करण्यात आले आहे. हे सेमिनार २ मे रोजी सकाळी ११ वाजता झूम व्हिडीओ कॉलद्वारे घेण्यात येणार असून, त्याची नोंदणी करण्यासाठी https://bit.ly/LokmatMahaSeWA या लिंंकचा आधार घ्यावा. दरम्यान, ‘लोकमत’ने कोरोनाविरोधात पुकारलेल्या लढ्यात नागरिकांना सहभागी होण्याचे आवहन करत स्वच्छता ठेवण्याचे आवाहन केले आहे. विशेषत: ‘लोकमत बेस्ट सोसायटी अॅवॉडर््स’अंतर्गत ‘लोकमत’ने सोसायट्यांना सुरक्षा बाळगण्याचे आवाहन केले आहे. या माध्यमातून ज्या ज्या सोसायट्या ‘लोकमत’च्या उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत; त्या प्रत्येक सोसायटीसह प्रत्येक मुंबईकराला स्वच्छता ठेवण्याचे आवाहन केले जात आहे. सोसायट्यांच्या माध्यमातूनच मुंबईकर कोरोनाला आळा घालू शकतात, असा विश्वास या उपक्रमाच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे.