मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विभागाने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व दस्त नोंदणीच्या सोयीसाठी विभागात काही ऑनलाइन सेवा उपलब्ध आहेत. या सेवांचा नागरिकांनी वापर करून दुय्यम निबंधक कार्यालयातील गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने सेवा व सुविधांचा वापर करण्याचे अनिवार्य केले आहे. दुय्यम निबंधक कार्यालयातील डेटा एंट्री किंवा दुरुस्त्या पूर्णपणे थांबविण्यात येत आहेत.
.......................................
महात्मा फुलेंच्या कार्यावर प्रकाशझाेत
मुंबई : थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत ११ एप्रिल २०२१ रोजी प्रसिद्ध वक्ते व इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे यांचे ‘महात्मा फुले : एक क्रांतिकारक महामानव’ या विषयावर व्याख्यान होईल. या विशेष व्याख्यानातून महात्मा फुले यांचे महत्त्वपूर्ण कार्य, याेगदानावर प्रकाश टाकला जाणार आहे.
.................................