Join us

वेडिंग प्लॅनरला ऑनलाईन शूज महागात !

By गौरी टेंबकर | Published: May 08, 2024 7:56 PM

वांद्रे पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई: ऑनलाइन शूज मागवणे एका वेडिंग प्लॅनरला महागात पडले. कारण यात त्यांना सायबर भामट्यांनी हजारोंचा चुना लावला. या प्रकरणी त्यांनी वांद्रे पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार झोय ब्लुज (३६) हे वांद्रे पश्चिम परिसरात मित्रासोबत राहत असून वेडिंग प्लॅनिंगचे काम करत त्यांचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांच्या तक्रारीनुसार त्यांनी २५ एप्रिल रोजी रात्री दैनंदिन वापराकरिता एका साइटवरून शूज ऑर्डर केले होते. त्यांना ते आवडल्याने त्याची किंमत ११ हजार रुपये त्यांनी डेबिट कार्डच्या मदतीने देण्याचा प्रयत्न केला. या प्रक्रियेदरम्यान त्यांना एक ओटीपी आला जो त्यांनी सदर साईटवर सबमिट केल्यावर त्यांच्या खात्यातून ३० हजार ५६१ रुपये काढून घेण्यात आले. त्यावेळी सदर वेबसाईट बनावट असून त्या मार्फत त्यांच्या कार्डची डिटेल्स चोरत ही फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी तक्रार करण्यासाठी वांद्रे पोलिसात धाव घेतली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :मुंबई