आॅनलाइन व्यवहार करताय?... सावधान! सायबर सुरक्षा संदर्भात कार्यशाळेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 02:11 AM2018-01-25T02:11:34+5:302018-01-25T02:11:45+5:30

सायबर गुन्हा टाळण्यासाठी संगणकाद्वारे आॅनलाइन व्यवहार करताना संकेतस्थळाची खातरजमा करावी, तसेच कोणतीही आर्थिक अथवा वैयक्तिक माहिती शेअर करताना काळजी घ्यावी, असे आवाहन वांद्रे कुर्ला संकुल येथील सायबर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल गायकवाड यांनी केले.

 Online transactions? ... Be careful! Organizing workshop on cyber security | आॅनलाइन व्यवहार करताय?... सावधान! सायबर सुरक्षा संदर्भात कार्यशाळेचे आयोजन

आॅनलाइन व्यवहार करताय?... सावधान! सायबर सुरक्षा संदर्भात कार्यशाळेचे आयोजन

Next

मुंबई : सायबर गुन्हा टाळण्यासाठी संगणकाद्वारे आॅनलाइन व्यवहार करताना संकेतस्थळाची खातरजमा करावी, तसेच कोणतीही आर्थिक अथवा वैयक्तिक माहिती शेअर करताना काळजी घ्यावी, असे आवाहन वांद्रे कुर्ला संकुल येथील सायबर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल गायकवाड यांनी केले.
ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र अंतर्गत महाराष्ट्र सायबर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने, सायबर सुरक्षा संदर्भात प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी पत्रकार कक्षात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, यात गायकवाड बोलत होते. महाराष्ट्र सायबरचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण कांबळे, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे आदी उपस्थित होते.
गायकवाड यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, बँकेचे व्यवहार, आॅनलाइन शिष्यवृत्ती, आॅनलाइन खरेदी आदी क्षेत्रांत संगणकाचे विश्व व्यापले आहे. आपली माहिती सुरक्षित राहावी, आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सायबर सुरक्षा महत्त्वाची आहे. फिशिंग, हॅकिंग, नोकरीची हमी दाखवून फसवणूक, वैयक्तिक ओळखीची चोरी, एटीएम फसवणूक, विवाह संकेतस्थळावरून फसवणूक, सोशल नेटवर्किंग साइटवरून होणारी फसवणूक, आॅनलाइन खरेदी करताना होणारी फसवणूक आदींचा समावेश सायबर गुन्ह्यांमध्ये होतो.
सायबर युगात सुरक्षित राहण्यासाठी कोणत्याही अनोळखी लिंक किंवा ईमेल उघडू नये, पासवर्ड वारंवार बदलावे, अँटिव्हायरस अपडेट ठेवावेत, बँकेचे अथवा इतर ओटीपी कोणालाही देऊ नये, मोबाइल अ‍ॅपमध्ये पासवर्ड जमा करून ठेऊ नये, ईमेलद्वारे अथवा कॉलच्या माध्यमातून येणाºया आर्थिक आमिषाला बळी पडू नये, समाज माध्यमातून व्हायरल होणाºया पोस्ट किंवा व्हिडीओ कोणालाही पुढे पाठवू नयेत, फेसबुक अथवा इतर समाज माध्यमातून येणाºया अनोळखी व्यक्तींशी संपर्क अथवा त्यांची विनंती मान्य करू नये, स्वत:चे अथवा कुटुंबीयांचे स्थळ, फोटो सोशल मीडियावर शेअर करू नयेत, आॅनलाइन खरेदी करताना संकेतस्थळाची सत्यता पडताळून घ्यावी, सुरक्षित संकेतस्थळाचा वापर करावा. बँकेत नोंदविलेला मोबाइल क्रमांक अपडेट ठेवावा, असे आवाहन गायकवाड यांनी केले. सायबर गुन्हे रोखण्यासाठी महाराष्ट्र सायबरतर्फे ४७ सायबर लॅब सुरू करण्यात आल्या आहेत. मुंबईत प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर सेलद्वारे गुन्ह्यांचा तपास करत आहोत अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title:  Online transactions? ... Be careful! Organizing workshop on cyber security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.