Mumbai Corona Update: मुंबईत कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही हजारो जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. मुंबईत लसीकरण पूर्ण झालेल्या एकूण नागरिकांपैकी ०.३५ टक्के जणांना कोरोना पुन्हा बाधा झाली आहे. हा आकडा जवळपास २३ हजारांच्या आसपास आहे. विशेष म्हणजे यात वृद्ध नागरिकांचं प्रमाण जास्त आहे.
मुंबई महापालिकेनं जाहीर केलेल्या एका अहवालात लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांना कोरोनाची पुन्हा लागण झाल्याबाबतची माहिती समोर आली आहे. यात ०.३५ टक्के लोकांना पुन्हा कोरोनाची बाधा झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. म्हणजेच दोन्ही डोस घेतलेल्या १ लाख नागरिकांमागे ३५० जणांना पुन्हा कोरोनाची बाधा होत आहे. दरम्यान, हे प्रमाण खूप कमी असल्याचा दावा पालिकेनं केला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याचं कोणतंही कारण नाही असं आवाहन करण्यात आलं आहे.
नागरिकांनी घाबरुन जाण्याची कोणतीही गरज नाही. अहवाल तयार करताना दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या तब्बल २५.३९ लाख इतकी होती हे आपण समजून घेतलं पाहिजे, असंही नमूद करण्यात आलं आहे. यातून ९,००१ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
मुंबईत २३ हजारांहून अधिक लसवंतांना पुन्हा कोरोनामुंबईत २३ हजार २३९ लसवंतांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. यात दोन्ही डोस घेऊनही ९ हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर पहिला डोस घेऊन कोरोना झालेल्यांची संख्या १४ हजार २३९ इतकी आहे. यात ६० वर्षांवरील नागरिकांचं प्रमाण सर्वाधिक आहे.