पालिकेने विकासकामांसाठी वापरला फक्त ४१ टक्के निधी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 01:30 AM2020-01-04T01:30:21+5:302020-01-04T01:30:34+5:30
निवडणुकीच्या वर्षात महापालिकेची विकासकामे थंडावली होती.
- शेफाली परब-पंडित
मुंबई : निवडणुकीच्या वर्षात महापालिकेची विकासकामे थंडावली होती. यामुळे आर्थिक वर्ष संपण्यास अवघे तीन महिने शिल्लक असताना अर्थसंकल्पातील तब्बल ४१ टक्के निधी पडून आहे. यामध्ये अग्निशमन दल, घनकचरा व्यवस्थापन आणि मलनिस्सारण विल्हेवाट प्रकल्प या महत्त्वाच्या खात्यांची विकासकामे मोठ्या प्रमाणात रखडली आहेत.
सन २०१९-२० या आर्थिक वर्षात ३० हजार ६९२ कोटींचा अर्थसंकल्प महापालिकेने सादर केला होता. यामध्ये विकासकामांसाठी १२ हजार ४७९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र गेल्या नऊ महिन्यांत यापैकी पाच हजार २२७ कोटी रुपयांची विकासकामे करण्यात आली आहेत. २०१८ मध्ये महापालिकेने नोव्हेंबर महिन्यापर्यंत ३७ टक्के निधी खर्च केला होता. गेल्या वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक असल्याने आचारसंहितेच्या काळात विकासकामांचे प्रस्ताव मंजूर करता आलेले नाहीत.
महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड आणि गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता या प्रकल्पांची कामे तांत्रिक अडचणीमुळे काही काळ ठप्प होती. त्यामुळे या प्रकल्पांसाठी असलेल्या तरतुदी पडून आहेत. मात्र येत्या तीन महिन्यांत हजारो कोटींचे प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी येणार आहेत, त्यामुळे निधी वाया जाणार नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार खर्च झालेला निधी
विभाग निधी नोव्हेंबर
२०१९ पर्यंत
रस्ते, वाहतूक ५३ टक्के
कोस्टल रोड १४ टक्के
पूल ५९ टक्के
पर्जन्य वाहिन्या ७९ टक्के उद्यान २० टक्के
घनकचरा
व्यवस्थापन १४.९० टक्के
विभाग निधी नोव्हेंबर
२०१९ पर्यंत
अग्निशमन दल ८.१० टक्के
माहिती तंत्रज्ञान १२.१० टक्के
आरोग्य ३३ टक्के
मालमत्ता ७५.१५ टक्के
मंडई ४६ टक्के
विकास नियोजन ०.६२ टक्के
गोरेगाव-मुलुंड लिंक रोड ३.६७ टक्के
सर्वात कमी खर्च
विभाग २०१९ २०१८
अग्निशमन दल ८.१०% ५८.५३ %
घनकचरा व्यवस्थापन १४.९०% २.० %
मुंबई मलनिस्सारण
विल्हेवाट प्रकल्प १४.८५% २९.४२%