- शेफाली परब-पंडित मुंबई : निवडणुकीच्या वर्षात महापालिकेची विकासकामे थंडावली होती. यामुळे आर्थिक वर्ष संपण्यास अवघे तीन महिने शिल्लक असताना अर्थसंकल्पातील तब्बल ४१ टक्के निधी पडून आहे. यामध्ये अग्निशमन दल, घनकचरा व्यवस्थापन आणि मलनिस्सारण विल्हेवाट प्रकल्प या महत्त्वाच्या खात्यांची विकासकामे मोठ्या प्रमाणात रखडली आहेत.सन २०१९-२० या आर्थिक वर्षात ३० हजार ६९२ कोटींचा अर्थसंकल्प महापालिकेने सादर केला होता. यामध्ये विकासकामांसाठी १२ हजार ४७९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र गेल्या नऊ महिन्यांत यापैकी पाच हजार २२७ कोटी रुपयांची विकासकामे करण्यात आली आहेत. २०१८ मध्ये महापालिकेने नोव्हेंबर महिन्यापर्यंत ३७ टक्के निधी खर्च केला होता. गेल्या वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक असल्याने आचारसंहितेच्या काळात विकासकामांचे प्रस्ताव मंजूर करता आलेले नाहीत.महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड आणि गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता या प्रकल्पांची कामे तांत्रिक अडचणीमुळे काही काळ ठप्प होती. त्यामुळे या प्रकल्पांसाठी असलेल्या तरतुदी पडून आहेत. मात्र येत्या तीन महिन्यांत हजारो कोटींचे प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी येणार आहेत, त्यामुळे निधी वाया जाणार नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार खर्च झालेला निधीविभाग निधी नोव्हेंबर२०१९ पर्यंतरस्ते, वाहतूक ५३ टक्केकोस्टल रोड १४ टक्केपूल ५९ टक्केपर्जन्य वाहिन्या ७९ टक्के उद्यान २० टक्केघनकचराव्यवस्थापन १४.९० टक्केविभाग निधी नोव्हेंबर२०१९ पर्यंतअग्निशमन दल ८.१० टक्केमाहिती तंत्रज्ञान १२.१० टक्केआरोग्य ३३ टक्केमालमत्ता ७५.१५ टक्केमंडई ४६ टक्केविकास नियोजन ०.६२ टक्केगोरेगाव-मुलुंड लिंक रोड ३.६७ टक्केसर्वात कमी खर्चविभाग २०१९ २०१८अग्निशमन दल ८.१०% ५८.५३ %घनकचरा व्यवस्थापन १४.९०% २.० %मुंबई मलनिस्सारणविल्हेवाट प्रकल्प १४.८५% २९.४२%
पालिकेने विकासकामांसाठी वापरला फक्त ४१ टक्के निधी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2020 1:30 AM