पार्किंग योजनेसाठी केवळ १२५ अर्ज

By admin | Published: May 22, 2017 03:50 AM2017-05-22T03:50:24+5:302017-05-22T03:50:24+5:30

वादग्रस्त ठरलेली पे अँड पार्क योजना अखेर अंमलात आली. मात्र, कुलाबा, चर्चगेट, फोर्ट विभागात वाहनतळ उपलब्ध करून देण्याचा हा प्रयोग फसल्याची चिन्हे आहेत

Only 125 applications for parking plan | पार्किंग योजनेसाठी केवळ १२५ अर्ज

पार्किंग योजनेसाठी केवळ १२५ अर्ज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वादग्रस्त ठरलेली पे अँड पार्क योजना अखेर अंमलात आली. मात्र, कुलाबा, चर्चगेट, फोर्ट विभागात वाहनतळ उपलब्ध करून देण्याचा हा प्रयोग फसल्याची चिन्हे आहेत. या योजनेला महिना उलटूनही रस्त्यावर ठरावीक जागेवर वर्षभर पार्किंगसाठी केवळ १२५ अर्ज महापालिकेकडे आले आहेत.
महत्त्वाची शासकीय व खासगी कार्यालये, व्यावसायिक संकुलामुळे फोर्ट, चर्चगेट, छत्रपती शिवाजी टर्मिनस हा विभाग गजबजलेला असतो. दररोज कामानिमित्त या विभागात सुमारे आठ लाख लोकांचा वावर असतो, तर या विभागात दीड लाख नागरिक वास्तव्य करतात. त्यामुळे पार्किंगची मोठी समस्या या विभागात जाणवते. मात्र, गजबजलेला विभाग असल्याने ‘ए’ वर्गात असलेल्या या विभागातील पार्किंगचे दर जास्त आहेत. त्यामुळे स्थानिकांकडून या योजनेला गेले वर्षभर विरोध होत आहे.
ही योजना ऐच्छिक असून, हमारतीच्या आवारात पार्किंग उपलब्ध नसल्यास, इच्छुक नागरिक अर्ज करू शकतात, असे पालिकेने स्पष्ट केले. घरासमोरील रस्त्यावर पार्किंगसाठी रहिवाशांना स्थानिक विभाग कार्यालयात अर्ज करून, कोणत्या रस्त्यावर पार्किंगसाठी जागा राखून हवी, हे सांगावे लागणार आहे. यासाठी ६०० ते १८०० रुपये शुल्क संबंधितांना आगाऊ भरावे लागणार आहे. त्यानुसार, हे १२५ अर्ज वाहतूक पोलिसांकडे पाठवले आहेत.


सोसायटीच्या सुरक्षारक्षकावर जबाबदारी
रात्री ८ ते सकाळी ८ या बारा तासांसाठी पार्किंगची जागा मिळणार आहे. यासाठी वार्षिक ६०० ते १८०० रुपये आकारण्यात येणार आहेत.
या ठिकाणी उभ्या गाडीवर वॉच ठेवण्याचे काम त्या सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाचे असणार आहे.
२०१५ मध्ये ही योजना आणण्यात आली. मात्र, २०१७ मध्ये महापालिकेच्या निवडणुकीआधी या योजनेला राज्य सरकारने मंजुरी दिली.

Web Title: Only 125 applications for parking plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.