मुंबई : अकरावीच्या तिसऱ्या फेरीत ३९ हजार ९६४ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट जाहीर करण्यात आली होती. मात्र, त्यातील केवळ १३ हजार ७३८ विद्यार्थ्यांनी तिसऱ्या फेरीत प्रवेश निश्चित केले असून, २६ हजार विद्यार्थ्यांनी यादीत नाव येऊनही प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे. अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीसाठी सध्या अर्ज नोंदणी सुरू असून, विशेष फेरीसाठी १ लाख ८९ हजार ८५३ जागा अद्याप रिक्त आहेत. अकरावी प्रवेशासाठी मुंबई विभागातून २ लाख ४२ हजार २६६ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ३० हजार ६४७ म्हणजेच ५४ टक्के विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश निश्चित केले आहेत, तर १ लाख १६ हजार ६१९ विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतला नसल्याची माहिती समोर आली आहे.
तिसऱ्या फेरीमध्ये २६ हजार २२६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नसून, त्यातील ४३ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहेत, तर ७९ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले असल्याची माहिती अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर दिलेल्या आकडेवारीवरून समोर आली आहे. तिसऱ्या फेरीमध्ये प्रथम क्रमांकाच्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश निश्चितीची संख्या वाढली असून, या फेरीत ६९ टक्के विद्यार्थ्यांनी हे प्रवेश निश्चित केले आहेत. तिसऱ्या फेरीत ६ हजार ९०१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले होते. त्यातील ४ हजार ८२३ विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेशाची निश्चिती केली आहे. दुसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ७ हजार ३६४ होती. त्यापैकी २५९९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय ५९६९ विद्यार्थ्यांना मिळाले होते. त्यातील फक्त १६७६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.
-----
अकरावी प्रवेशाची तिसऱ्या फेरीची माहिती
तिसऱ्या फेरीसाठी एकूण उपलब्ध जागा -११९३३३
तिसऱ्या फेरीत जागा अलॉट झालेले विद्यार्थी- ३९९६४
तिसऱ्या फेरीअखेर प्रवेशित विद्यार्थी - १३७३८
तिसऱ्या फेरीत प्रवेश न घेतलेले विद्यार्थी - २६२२६
तिसऱ्या फेरीत पहिल्या पसंतीचे महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थी - ४८२३
-----
कोटानिहाय रिक्त जागा
कोटा - प्रवेशित विद्यार्थी - प्रत्यार्पित जागा - रिक्त जागा
इनहाउस - ७२१७- ४८९२- ८६३२
अल्पसंख्याक -२७२१५- ३६७०६- २४०२५
व्यवस्थापन - ३४६५- ६७४- ११७१९
--------
तिसऱ्या फेरीत पसंतीक्रमानुसार प्रवेशित विद्यार्थी
पसंतीक्रम - अलॉटमेंट - प्रवेशित- प्रवेश न घेतलेले
पहिला - ६९०१- ४८२३- २०७८
दुसरा - ७३६४- २५९९- ४७६५
तिसरा - ५९६९- १६७६- ४९९३
------------