Join us

९५ टक्क्यांवरील जागांसाठी राज्य मंडळाचे केवळ २० टक्के विद्यार्थी ठरले पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 5:08 AM

अंतर्गत गुण कमी केल्याचा फटका । अकरावीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ यंदाही सुरूच आहे. अकरावीची ५ वाजता जाहीर होणारी सर्वसाधारण गुणवत्ता यादी ५ जुलैला रात्री ११ वाजता जाहीर झाली. यात अपेक्षेप्रमाणे अंतर्गत गुण कमी केल्याचा फटका राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना बसला. ९५% व त्याहून अधिक गुण असणाऱ्या १,४८७ विद्यार्थ्यांपैकी १,१८६ जागांवर सीबीएसई, आयसीएसई, आयजीसीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली. यात केवळ ३०१ विद्यार्थी हे राज्यमंडळाचे आहेत.

९५ टक्क्यांहून अधिक गुणांसाठीच्या फक्त २० टक्के जागांवर राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. सर्वसाधारण यादीत १,८५,१७३ विद्यार्थी असून राज्य मंडळाचे केवळ १,६८,९९१ विद्यार्थी आहेत. १,८५,४७३ पैकी कला शाखेसाठी १७,३०१, वाणिज्यसाठी १,१७,२७५, विज्ञान शाखेसाठी ४९,५४३ तर, एचएसव्हीसीसाठी १,३५४ विद्यार्थ्यांची निवड झाली. सर्वसाधारण गुणवत्ता यादीत ८० ते ९० टक्क्यांदरम्यान २४,९२६ विद्यार्थी आहेत. यात राज्य मंडळाचे केवळ २०,१९० विद्यार्थी आहेत.रविवारी सुरू राहणार उपसंचालक कार्यालय : विद्यार्थी अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर आपला लॉगइन आयडी टाकून सर्वसाधारण गुणवत्ता यादी तपासू शकतील. दरम्यान, विद्यार्थ्यांना अजूनही आपल्या अर्जात बदल करायचा असल्यास त्यांना तो सोमवार, ८ जुलैपर्यंत योग्य ते प्रमाणपत्र उपसंचालक कार्यालयात घेऊन जाऊन करता येईल. विद्यार्थ्यांची आवश्यकता लक्षात घेऊन रविवारीसुद्धा मुंबई उपसंचालक कार्यालय सुरू राहील.

माहितीची यंत्रणा उपलब्ध करून देण्याची मागणीयादी जाहीर होण्यास रात्रीचे ११ वाजले. यासंदर्भात विद्यार्थी-पालकांनी प्रचंड तक्रारी केल्या आहेत. दरम्यान, मुंबई उपसंचालक कार्यालयाकडूनही माहिती उपलब्ध होत नसल्याने पालकांच्या रोषात वाढ झाली. अकरावी आॅनलाइन प्रवेशाची योग्य, अचूक माहितीसाठी योग्य ती यंत्रणा सुरू करावी, अशी पालकांकडून होत आहे.च्८० ते ९० टक्क्यांवर प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांमध्ये ८० टक्के विद्यार्थी हे राज्य मंडळाचे असतील. ९५ टक्के व त्याहून अधिक गुण असणाऱ्यांमध्ये फक्त २० टक्के प्रवेश राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना मिळतील. ९० ते ९४.९९ टक्के असणाºयांमध्ये ६,६०७ विद्यार्थी आहेत.च्यातील ३,१५४ राज्य मंडळाचे तर आयसीएसई मंडळाचे ४,१४६, र सीबीएसईचे १,९६० तर, आयजीसीएसईचे १६२ विद्यार्थी आहेत. ९० ते ९४ टक्क्यांमध्ये राज्य मंडळाच्या ५२ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश असून त्यांना प्रवेश मिळणार आहे.