मुंबई - मुंबईसह राज्यातील प्राध्यापकांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात संघटनांच्या शासनासोबत चर्चांचे गुºहाळ सुरूच असून, अद्याप त्यांना यश आलेले नाही. संपाच्या चौथ्या दिवशी मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातल्या २२ टक्के प्राध्यापकांनीच संपात सहभाग नोंदविला.शुक्रवारी संपाच्या चौथ्या दिवशी राज्यातील एकूण ५,१३७ प्राध्यापक संपावर असल्याची माहिती मिळाली आहे. राज्यात एकूण कार्यरत प्राध्यापकांची संख्या २३,७२२ इतकी असून, त्यापैकी १८,५८५ प्राध्यापक हे संपात सहभागी झाले नाहीत. जळगाव आणि औरंगाबाद विभागात तर एकही प्राध्यापक संपावर नसल्याने तेथे संपाचा पुरता फज्जा उडाल्याची चर्चा आहे. मुंबई व नागपूर विभागातही अनुक्रमे १०८ व १०१ प्राध्यापक संपात सहभागी झाले आहेत.संपाच्या चौथ्या दिवशी बळकटी मिळत असून, मुंबई व राज्यातील अनेक प्राध्यापक संपात सहभागी होत असल्याची माहिती बॉम्बे युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स युनियन (बुक्टो)च्या मधू परांजपे यांनी दिली.कोल्हापूर, पुण्यातले सर्वाधिक प्राध्यापकसंपात कोकणातल्या प्राध्यापकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याने, अनेक महाविद्यालयांंमध्ये बंद पाळण्यात आला आहे. संपाचा परिणाम कोल्हापूर आणि पुणे विभागात दिसून येत आहे. तेथे तब्ब्ल १,६४३ व १,४६२ प्राध्यापक संपावर असल्याची माहिती मिळाली आहे.शिक्षणमंत्र्यांचे टिष्ट्वटरवरून आवाहनसातवा वेतन आयोग, ७१ दिवसांच्या संप काळातील प्राध्यापकांचे वेतन, प्राध्यापक भरती या महत्त्वाच्या विषयांवर शासन सकारात्मक असून, याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन प्राध्यापकांनी संप मागे घेण्याचे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी टिष्ट्वटरवरून केले आहे.
राज्यातले केवळ २२ टक्केच प्राध्यापक संपात सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 07:31 IST