मुंबईत केवळ ३० टक्के नोंदणीकृत रिक्षा रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:24 AM2020-12-13T04:24:43+5:302020-12-13T04:24:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य सरकारने अनलाॅक केल्यानंतर सुमारे सहा महिन्यांनंतरही नोंदणीकृत ऑटोरिक्षांपैकी केवळ ३० टक्के रिक्षा ...

Only 30% of registered rickshaws on the road in Mumbai | मुंबईत केवळ ३० टक्के नोंदणीकृत रिक्षा रस्त्यावर

मुंबईत केवळ ३० टक्के नोंदणीकृत रिक्षा रस्त्यावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्य सरकारने अनलाॅक केल्यानंतर सुमारे सहा महिन्यांनंतरही नोंदणीकृत ऑटोरिक्षांपैकी केवळ ३० टक्के रिक्षा रस्त्यांवर फिरत आहेत, असा दावा मुंबई रिक्षा मेन्स असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी थम्पी कुरियन यांनी केला.

कुरियन यांनी सांगितले की, सध्या मुंबईतील नोंदणीकृत ऑटोरिक्षांची लोकसंख्या सुमारे अडीच लाख असून, त्यापैकी दीड लाखांहून अधिक लोक पश्चिम उपनगरात आहेत. सध्या मुंबईच्या रस्त्यांवर ७५ हजार ऑटोरिक्षा सुरू आहेत. जोपर्यंत लोकल गाड्या, शाळा आणि महाविद्यालये सुरळीत सुरू होत नाहीत, तोपर्यंत ऑटोरिक्षा रस्त्यापासून दूर राहतील. कारण आमचे बहुतेक प्रवासी एक तर दैनंदिन कार्यालयात जाणारे किंवा शाळा आणि महाविद्यालयांचे विद्यार्थी आहेत.

तसेच त्यांनी सांगितले की, सध्या मुंबईत सुमारे १०० नोंदणीकृत ऑटोरिक्षा मार्ग आहेत. शेअरिंग रिक्षात रिक्षाचालक एका वेळी तीन प्रवाशांना घेऊन जाते. सरकारच्या आदेशानुसार, ऑटोरिक्षात दोनपेक्षा जास्त प्रवाशांना परवानगी नाही, ज्यामुळे रिक्षाचालकांचे प्रचंड नुकसान होत आहे. कारण बहुतेक शेअरिंग मार्ग अजूनही कार्यरत नाहीत. शेअरिंग मार्गावर दोन प्रवासी घेऊन गेल्यास प्रत्येक प्रवासात वाहनचालकांना ३३ टक्के नुकसान सहन करावे लागते, असेही ते म्हणाले.

आता सार्वजनिक वाहतूकसेवा पूर्णपणे सुरू नाही. ७० घर ते रेल्वे स्थानक असे होते. मात्र, आता रेल्वे बंद असल्याने मुंबईकर स्वत:च्या गाड्या आणि दुचाकी वाहनांचा प्रवास करत आहेत. लोक फक्त कमी अंतराच्या प्रवासासाठी रिक्षांचा वापर करत आहेत. यामुळे इंधन खर्च होत आहे, त्या तुलनेतही कमी महसूल मिळत आहे.

थम्पी कुरियन, जनरल सेक्रेटरी रिक्षा मेन्स असोसिएशन

लोकल सुरू नसल्याचा फटका रिक्षाचालकांना बसला आहे. प्रवासी कमी मिळत आहेत. कोरोना काळात अनेक रिक्षाचालक गावी गेलेले काही रिक्षा चालक अजून परतले नाहीत. लवकरात लवकर लोकल सर्वांसाठी सुरू करायला हवी.

अभिषेक गायकवाड, रिक्षाचालक

रिक्षांची संख्या कमी आहे, त्यामुळे १० ते १५ मिनिटे वाट पाहावी लागत आहे. ऑनलाइन रिक्षा लवकर मिळत होत्या. मात्र, त्यासाठीही वेळ लागत आहे. अनेक मित्रांनी वेळ होतो, म्हणून स्वतः दुचाकी घेतल्या आहेत.

निखिल डोळसे, प्रवासी

Web Title: Only 30% of registered rickshaws on the road in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.