Join us

अंधेरी पोटनिवडणुकीत अवघे ३१ टक्के मतदान; मतदारांमध्ये निरुत्साह, रविवारी निकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2022 6:34 AM

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या मतदारसंघात लटके यांच्या पत्नी ऋतुजा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

मुंबई : अंधेरी विधानसभा मतदारसंघात गुरुवारी झालेल्या पोटनिवडणुकीत मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला. या ठिकाणी अवघ्या ३१ टक्के मतदानाची नोंद झाली. रविवारी, ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर होत असलेली ही पहिलीच निवडणूक असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. 

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या मतदारसंघात लटके यांच्या पत्नी ऋतुजा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर अन्य सहा उमेदवार अपक्ष आहेत. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारपर्यंत किंचित ठिकाणी उत्साहाने मतदान सुरू होते. एकूणच मतदानासाठीचा प्रतिसाद कमी होता. मतदारांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा भरणा अधिक होता. सायंकाळी सहा वाजता मतदान संपले, त्यावेळी ३१ टक्के मतदानाची नोंद झाली होती.  

पोलिसांचा बंदोबस्त 

२५६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. येथील सुरक्षा व्यवस्थेसाठी मुंबई पोलीस दलासह विविध सुरक्षा दलांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. 

मतदार संख्या तपशील 

  • पुरुष मतदार - एक लाख ४६ हजार ६८५  
  • महिला मतदार - एक लाख २४ हजार ८१६ 
  • तृतीयपंथीय मतदार - एक 
  • एकूण मतदार - दाेन लाख ७१ हजार ५०२  
  • सेवा मतदार - २९ 
  • दिव्यांग मतदार - ४१९
टॅग्स :शिवसेनानिवडणूकउद्धव ठाकरे