राज्यातील धरणांत ३१ टक्केच पाणीसाठा; परिस्थिती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 07:43 AM2023-07-17T07:43:05+5:302023-07-17T07:43:18+5:30

राज्यातील महत्त्वाच्या धरणांत ३२.२९ टक्के पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे

Only 31 percent water storage in dams in the state; The situation is serious | राज्यातील धरणांत ३१ टक्केच पाणीसाठा; परिस्थिती गंभीर

राज्यातील धरणांत ३१ टक्केच पाणीसाठा; परिस्थिती गंभीर

googlenewsNext

मुंबई : मान्सून सक्रिय होऊन महिना उलटला तरी अद्याप धरक्षेत्रावर मात्र पावसाची कृपादृष्टी झालेली नाही.  मागील वर्षी याच तारखेला धरणांत ५९.३३ टक्के पाणीसाठा असताना यंदा मात्र धरणांत केवळ ३१.२९ टक्केच पाणीसाठा आहे. पाण्यापासून वीजपुरवठ्यापर्यंतची भिस्त असलेल्या कोयना धरणातही अवघा १९.१० टक्के पाणीसाठा असल्याने राज्यात पाण्याची स्थिती गंभीर आहे. गेल्या महिनाभरात अधूनमधून पडणाऱ्या पावसाने पाणीसाठ्यात केवळ १० टक्के वाढ झाली आहे. 

राज्यातील महत्त्वाच्या धरणांत ३२.२९ टक्के पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. याव्यतिरिक्त मध्य आणि लहान प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची परिस्थितीही फारशी बरी नाही.  नागपूर विभागात ४८.०३ टक्के, अमरावती ४१.९३ टक्के, छत्रपती संभाजीनगर २४.७० टक्के, नाशिक ३०.८४ टक्के, पुणे २१.५२ टक्के, कोकण विभागातील धरणांत  ५४.५१ टक्के इतकाच पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे.

टँकरची संख्या वाढली
राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे धरणांतील पाणीसाठा खालावत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याचे प्रमाण वाढत आहे. राज्यात सध्या विविध वाड्यावस्त्यांवर ३२६ टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. नाशिकमध्ये ५३, जळगाव ३६, अहमदनगर ४७,  पुणे ३५, सातारा ५४, सोलापूर १०, औरंगाबाद ३७,  अमरावती १०, बुलढाणा २३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. राज्यातील ३६४ गावे, ९५५ वाड्यांत अद्याप टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.

मुंबईतील धरणांतील पाणीसाठा

    भातसा    ४१.३३%
    मोडकसागर    ६६%
    तानसा    ६४.१८%
    मध्य वैतरणा    ४४.४७%
    वैतरणा    ३६.३१%

Web Title: Only 31 percent water storage in dams in the state; The situation is serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.