दोन वर्षांत बांधली केवळ ६० टक्के शौचालये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 06:01 AM2018-10-21T06:01:56+5:302018-10-21T06:01:58+5:30

जागेअभावी मुंबईत सार्वजनिक शौचालय बांधण्याचा महापालिकेचा प्रकल्प मागे पडला आहे.

Only 60 percent toilets built in two years | दोन वर्षांत बांधली केवळ ६० टक्के शौचालये

दोन वर्षांत बांधली केवळ ६० टक्के शौचालये

Next

मुंबई : जागेअभावी मुंबईत सार्वजनिक शौचालय बांधण्याचा महापालिकेचा प्रकल्प मागे पडला आहे. गेल्या दोन वर्षांत निश्चित केलेल्या सार्वजनिक शौचालयांपैकी ४० टक्के शौचालय महापालिकेने अद्याप बांधले नसल्याचे शनिवारी झालेल्या महासभेत समोर आले. याचा मोठा फटका मुंबई हागणदारीमुक्त करण्याच्या मोहिमेला बसला आहे. त्यामुळे पुढील तीन महिन्यांत ठेकेदारांपुढे तब्बल २४१७ शौचालय बांधण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबईत सार्वजनिक शौचालय बांधण्यात येत आहे. त्यानुसार आॅक्टोबर २०१६ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत पाच हजार १३७ शौचालय बांधण्यात येणार होते. त्यासाठी २० ठेकेदार नेमले होते. मात्र दोन वर्षांत २७२० शौचालये बांधली आहेत. तर नऊ ठेकेदारांनी मुदतवाढ मागितली होती. परंतु दिलेल्या मुदतीत शौचालय बांधण्यात येत नाही, हे महापालिकेचे अपयश असल्याचा आरोप नगरसेवकांकडून होत आहे.
जुलै महिन्यात पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात मुंबईतील ९३४ शौचालयांची पाहणी केल्यानंतर ४२३ शौचालय धोकादायक असल्याचे उजेडात आले. ही शौचालये तात्काळ पाडण्याची गरज आहे. मात्र जागेची टंचाई आणि विविध अडचणींमुळे ही कामे उर्वरित तीन महिन्यांत कशी पूर्ण होणार असा सवाल सदस्यांनी केला.
>४२३ शौचालये धोकादायक
महापालिकेने जुलै महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात ९३४ सार्वजनिक शौचालयांचे आॅडिट करण्यात आले. त्यात ४२३ शौचालय धोकादायक असल्याचे उजेडात आले.
१९९७ ते २०१८ या २० वर्षांत १४ हजार ३६९ शौचालय बांधण्यात आली. ही शौचालय झोपडपट्ट्यांमधील नोंदणीकृत संस्थांच्या ताब्यात देण्यात आली.
महापालिकेने २०२१ पर्यंत मुंबईत २२ हजार ७७४ शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ही शौचालय दुमजली व तीन मजली असणार आहेत.
संपूर्ण २४ विभागांमध्ये शौचालय बांधण्यासाठी महापालिकेला ५३६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

Web Title: Only 60 percent toilets built in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.