Join us  

मुंबईत फक्त ६० खड्डे - पालिका

By admin | Published: July 05, 2016 2:19 AM

गेल्या आठवड्यापासून सतत पाऊस कोसळत असल्याने मुंबईतील रस्त्यांची चाळण होत असून, हे खड्डे बुजविणेही अवघड झाले आहे़ खड्ड्यांच्या तक्रारी दररोज धडकत असताना मुंबईत

मुंबई : गेल्या आठवड्यापासून सतत पाऊस कोसळत असल्याने मुंबईतील रस्त्यांची चाळण होत असून, हे खड्डे बुजविणेही अवघड झाले आहे़ खड्ड्यांच्या तक्रारी दररोज धडकत असताना मुंबईत फक्त ६० खड्डे बुजविण्याचे शिल्लक असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे़ मात्र खड्ड्यांची संख्या आणि मुंबईकरांचे हाल दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून येत आहे़मुंबई खड्डेमुक्त करण्याचा पालिकेचा दावा प्रत्येक पावसाळ्यात सपशेल फोल ठरत असतो़ रस्ते चकाचक करण्याचा मास्टर प्लॅन हा प्रत्यक्षात कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा प्लॅन ठरला़ रस्त्यांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्याने त्यांच्या दर्जाबाबत साशंकता कायम आहे़ त्यामुळे पावसाळ्यात काँक्रिटच्या रस्त्यांनी दिलासा देण्याऐवजी मुंबईकरांचे टेन्शन वाढविले आहे़२८ जून रोजी पालिकेकडे खड्ड्यांच्या १८८ तक्रारी आल्या होत्या़ त्यापैकी १३२ तक्रारींवर कारवाई करण्यात आली़ तर ५६ तक्रारी शिल्लक होत्या़ १ जुलै रोजी दीडशे तक्रारींपैकी १४० खड्डे बुजविण्यात आले़ त्यात २ जुलै रोजी पुन्हा खड्ड्यांची भर पडली़ अशा एकूण २८४ खड्ड्यांपैकी केवळ ६० खड्डे शिल्लक असल्याचा दावा उपायुक्त सुधीर नाईक यांनी पत्रकार परिषदेतून केला़ (प्रतिनिधी)ठेकेदारांना दंड : हमी कालावधीत असलेल्या रस्त्यांवर खड्डे पडल्यास ठेकेदारांनाच ते खड्डे भरावे लागणार आहेत़ तसेच त्यांच्यावर दंडही पालिका आकारणार आहे़ तर हमी कालावधी संपलेल्या रस्त्यांची डागडुजी पालिकेलाच करून घ्यावी लागणार आहे़