Join us

तिन्ही तारकांचे एकच उत्तर... ड्रग्ज सेवन नाही, नाही, नाही...!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2020 6:02 AM

एनसीबीकडून दीपिका, श्रद्धा, साराची कसून चौकशी

मुंबई : आघाडीच्या अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची ड्रग्जसेवनाबद्दल एनसीबी अधिकाऱ्यांकडून साडेपाच तास स्वतंत्रपणे कसून चौकशी करण्यात आली. तिघींनी ड्रग्जबाबत अप्रत्यक्ष संपर्क आल्याची कबुली दिली असली त्याच्या सेवनाचा मात्र ठामपणे इन्कार केलाचे समजते. तिघींनी अनेक प्रश्नांवर असमाधानकारक उत्तरे दिल्याने त्यांना क्लिनचिट देण्यात आलेली नाही. मात्र त्यांना तूर्तास तातडीने पुन्हा चौकशीसाठी बोलाविले जाणार नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

दीपिकाने तिची मॅनेजर करिष्मा प्रकाशसमवेत ड्रगचॅट मान्य केले, मात्र आपण पार्टीत ड्रग घेतले नसल्याचे सांगितले. तर सारा व श्रद्धा यांनी अनुक्रमे ‘केदारनाथ’ व ‘छिछोरे’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी सुशांत ड्रग्ज घेत होता, आपण मात्र त्यापासून अलिप्त होतो, अशी कबुली दिली आहे. श्रद्धाने सीबीडी आॅइल हे सेवनासाठी नाही तर अंग दुखत असल्याने मागविले होते, असा जबाब 

दिला असल्याचे सुत्राकडून स्पष्ट करण्यात आले. ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी जया साहा हिने दिलेल्या माहितीतून आघाडीच्या अभिनेत्रींची नावे पुढे आल्याने बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. एनसीबीने तिघींना समन्स बजावल्यानंतर तिघींनी शनिवारी एनसीबी कार्यालयात हजेरी लावली.क्षितिज प्रसादला अटक का?क्षितिज प्रसादची सुमारे २४ तास सखोल चौकशी केल्यानंतर त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून बॉलिवूडमधील ड्रगमध्ये गुंतलेली मोठी नावे उघड होण्याची शक्यता आहे. अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाच्या तपासात चव्हाट्यावर आलेल्या ड्रग्ज कनेक्शन प्रकरणातील आतापर्यंतची ही विसावी अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी त्याच्या घरातून गांजा जप्त केला होता. त्याबाबत शुक्रवारी केलेल्या चौकशीत त्याने असमाधानकारक उत्तरे दिली. तो हॅश आणि एमडीएमएची विक्री करत असल्याचा एनसीबीचा संशय आहे. त्याच्यासोबत घरी होणाऱ्या प्रत्येक पार्टी किंवा कार्यक्रमात ड्रग पेडलर अंकुश सहभागी असल्याने त्याचा ड्रग तस्करीतील सहभाग स्पष्ट झाला आहे.केंद्रीय तपास यंत्रणेवर दबावाचा प्रयत्न, रियाच्या वकीलाचा आरोपअभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात बिहारच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय तपास यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप अभिनेत्री आणि या प्रकरणातील मुख्य संशयित रिया चक्रवर्ती हिचे वकील अ‍ॅड. सतीश माने - शिंदे यांनी केला. या प्रकरणात आधीच ठरवून दिलेले निष्कर्ष लादण्याचा प्रयत्न केला जात असून वादग्रस्त वक्तव्य करणाºया डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन राजकारणात प्रवेश करणे हे त्याचेच द्योतक आहे. या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे व्हायला हवा.’ असे म्हणत सुशांतच्या व्हिसेरा तपासणीप्रकरणी सीबीआयने स्वतंत्र मेडिकल बोर्डाची स्थापना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दीपिकाची रात्रभर वकिलांशी सल्लामसलतदीपिका शुक्रवारी रात्री घरी न जाता पंचतारांकित हॉटेलात थांबली होती. तिचा पती रणवीर सिंह व तिने तेथे वकिलांशी चर्चा केली. त्यानंतर सकाळी तेथूनच ती एनसीबी कार्यालयात एकटीच गेली.

दीपिका : ड्रग्जचॅट केले पण सेवन नाहीदीपिका पदुकोण सकाळी ९.५0 वाजता एनसीबी कार्यालयात पोहचली. थोड्या वेळानंतर तिची मॅनेजर करिष्मा प्रकाशही आली. दोघींची स्वतंत्र चौकशी करताना अधिकाºयांनी त्यांचे मोबाईल ताब्यात घेतले होते. दीड तासानी करिष्माला दीपिकासमोर बसवून पाच अधिकाºयांकडून दोघींवर प्रश्नांची सरबत्ती करीत व्हाट्सअप चॅट, कोको पार्टीबाबत विचारणा करण्यात आली. दीपिकाने ती अ‍ॅडमिन असलेल्या व्हॉटसअप ग्रुपवर व जयासोबत ड्रगसंदर्भात चॅट केल्याची कबुली दिली. मात्र स्वत: कधीही ड्रग्जसेवन केले नसल्याचे सांगितल्याचे समजते. ३.३०च्या सुमारास दीपिकाकडील चौकशी थांबविण्यात आली.श्रद्धा : पार्टीत ड्रग्जचा वापरदुपारी बारा वाजता श्रद्धा कपूर एनसीबी कार्यालयात पोहचली. जया साहामार्फत सीबीडी आॅईल मागितल्याची कबुली तिने दिली. मात्र ते सेवन केले नाही. अंग दुखत असल्याने ते मागवल्याचे सांगितले. ‘छिछोरे’च्या वेळी सुशांतसिंह गांजा घेत होता, पवना येथील पार्टीत तो मद्य, ड्रग्ज घेत असे. पार्टी, नाचगाण्यात मी सहभागी होत असे. मात्र ड्रग्जचे सेवन केले नाही, असे तिने सांगितले. चौकशीनंतर सुमारे पावणे सहाच्या सुमारास ती एनसीबीच्या कार्यालयातून बाहेर पडली.सारा : सुशांत घेत असे शूटिंगवेळी गांजासारा खान दुपारी एक वाजता एनसीबी कार्यालयात पोहचली. तिच्याकडे सुशांतसिंहबद्दल, त्याच्या व्यसनाबद्दल, केदारनाथ चित्रपट व थायलंड ट्रिपबद्दल माहिती विचारण्यात आली. शुटिंगच्यावेळी सुशांतसिंह गांजा, चरस घेत होता, सेटवर बहुतांश जणांना त्याबद्दल माहिती होती. आपण मात्र कधीही त्याचे सेवन केले नाही. तसेच कोणत्याही ड्रग तस्कराला आपण ओळखत नसल्याची माहिती तिने दिली असल्याचे सांगितले. तिचा चालक रईसच्या ड्रग्ज सेवनाबद्दलचा आरोप तिने फेटाळून लावल्याचे सांगण्यात आले. तिला साडेपाचच्या सुमारास तिला कार्यालयातून सोडण्यात आले.तपास संस्था असमाधानी, कुणालाही क्लीन चिट नाही, तूर्त चौकशीही नाही

टॅग्स :सारा अली खानअमली पदार्थबॉलिवूड