Join us  

मोठ्या प्राण्यांचे शवविच्छेदन स्पॉटवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 4:25 AM

- कोंडवाड्यातील गायीच्या व्हायरल फोटोबाबत अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरणफोटो मेल.लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कांदिवलीतील गुरांच्या कोंडवाड्यातील गायीच्या शवविच्छेदनाचा ...

- कोंडवाड्यातील गायीच्या व्हायरल फोटोबाबत अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

फोटो मेल.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कांदिवलीतील गुरांच्या कोंडवाड्यातील गायीच्या शवविच्छेदनाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे बऱ्याच उलटसुलट चर्चांना ऊत आला होता. मात्र याबाबत देवनार कत्तलखान्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देत यावर पूर्णविराम लावला आहे.

कांदिवलीत गुरांच्या कोंडवाड्यातील एका गायीच्या शवविच्छेदनाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. गायीचे शवविच्छेदन उघड्यावर करण्यात आल्याचा आरोप करत संबंधित अधिकारी नियमांचे पालन करीत नसल्याचेही म्हटले जात होते. मात्र नियमानुसार मोठ्या प्राण्यांचे शवविच्छेदन हे नेहमी त्यांचा मृत्यू झाला त्याच घटनास्थळी जाऊन केले जाते, असे देवनार कत्तलखान्याचे महाव्यवस्थापक डॉ. योगेश शेटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मोठ्या प्राण्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणे बरेच त्रासदायक ठरते, त्यामुळे आम्ही जागीच जाऊन ते करण्यास प्राधान्य देतो. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने समाज माध्यमांवर अशा प्रकारे फोटो व्हायरल करून सामान्य नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण करू नये, अशी विनंतीदेखील अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. गायीचे शवविच्छेदन करीत मृतदेह काही दिवस उघड्यावर ठेवण्यात आल्याचा दावा फोटोसोबत करण्यात आला होता.