बेस्ट समिती सदस्यालाच वाढीव बिलाचा झटका
By admin | Published: January 16, 2016 02:01 AM2016-01-16T02:01:40+5:302016-01-16T02:01:40+5:30
बेस्टच्या विद्युत विभागाकडून ग्राहकांना वाढीव वीज बिल जात असल्याच्या तक्रारी आतापर्यंत येत होत्या़ मात्र या वेळेस चक्क काँग्रेसच्या बेस्ट समिती सदस्यालाच तब्बल
मुंबई : बेस्टच्या विद्युत विभागाकडून ग्राहकांना वाढीव वीज बिल जात असल्याच्या तक्रारी आतापर्यंत येत होत्या़ मात्र या वेळेस चक्क काँग्रेसच्या बेस्ट समिती सदस्यालाच तब्बल ८५ हजार रुपये बिल
आल्याने त्यांच्या पायाखालची
जमीन सरकली आहे.
विशेष म्हणजे वाढीव वीजदराचा विरोध करण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी मुंबईत असताना हा प्रकार उजेडात
आला आहे़
रवी राजा यांना एक महिन्याचे तब्बल ८५ हजार ६७५ रुपये बिल आले आहे़ आपले महिन्याचे बिल सरासरी ५ हजार रुपये असताना एवढी मोठी रक्कम म्हणजे वीज विभागातील घोटाळाच असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला आहे.
वीज विभागातील अधिकारी बेस्टकडून पगार घेतात, मात्र टाटा कंपनीला कमाई करून देण्याच्या प्रयत्नात असतात, असा आरोप केल्यामुळेच आपल्याला लक्ष्य करण्यात येत आहे, असे त्यांनी
म्हटले आहे.
वाढीव बिल चुकून गेले
असावे, असा अंदाज बेस्ट समितीचे अध्यक्ष अरुण दुधवडकर यांनी यावर व्यक्त केला़ (प्रतिनिधी)
चौकशीचे आदेश
महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत.
तसेच अशी चूक करणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाईचे संकेतही त्यांनी दिले आहेत.